गावसकरांचा आशीर्वाद अन् अय्यरनं पदार्पणात ठोकलं शतक |India vs New Zealand, 1st Test Day 2 Shreyas Iyer Test Century | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shreyas Iyer

गावसकरांचा आशीर्वाद अन् अय्यरनं पदार्पणात ठोकलं शतक

sakal_logo
By
सुशांत जाधव

India vs New Zealand, 1st Test Day 2 Shreyas Iyer Test century : न्यूझीलंड विरुद्धच्या कानपूर कसोटीत श्रेयस अय्यरने पदार्पणात शतकी खेळी केलीये. 157 चेंडूच त्याने शतकाला गवसणी घातली. ऐककाळी भारतीय संघात मुंबईकरांचा दबदबा असायचा. अर्ध्यापेक्षा अधिक खेळाडू मुंबईचे असायचे. विजय मांजरेकर, गावस्कर, वेंगसरकर, तेंडुलकर, आगरकर यांनी आपापला काळ गाजवल्याचे पाहायला मिळाले. सध्याच्या घडीला रोहित शर्मा पाठोपाठ श्रेयस अय्यर मुंबई क्रिकेटची परंपरा पुढे घेऊन जाताना दिसते. गावसकरांकडून पदार्पणाची कसोटी कॅप घेत एका प्रकारे आशिर्वाद घेणाऱ्या श्रेयसने संधीच सोन करुन दाखवलं आहे. आपल्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात अय्यरने 171 चेंडूत 13 चौकार आणि 2 चौकाराच्या मदतीने 105 धावांची खेळी केली. साउदीनं त्याच्या खेळीला ब्रेक लावला.

हेही वाचा: सिंधू, प्रणीतचा झंझावात; श्रीकांतचे आव्हान संपुष्टात

भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी हाती घेतल्यानंतर राहुल द्रविड यांनी जुनी परंपरा पुन्हा सुरु केलीये. संघात पदार्पण करणाऱ्या खेळाडूला माजी क्रिकेटरच्या हस्ते पदार्पणाची कॅप देण्याचा सिलसिला टी-20 नंतर कसोटी सामन्यातही पाहायला मिळाला. टी-20 मध्ये व्यंकटेश अय्यरला अजित आगरकर यांनी कॅप दिल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर कसोटी पदार्पणात श्रेयसला मान देण्यासाठी द्रविडने गावसकरांना निमंत्रित केले होते. कानपूरमध्ये दमदार रेकॉर्ड असणाऱ्या गावसकरांच्या आशिर्वादासह कसोटी खेळण्यासाठी मैदानात उतरलेल्या श्रेयस अय्यरने गुरु द्रविड यांचा विश्वास सार्थ ठरवला आहे.

अय्यर भारताकडून पदार्पणाच्या कसोटी सामन्यात शतक झळकवणारा 16 वा खेळाडू आहे. कसोटी पदार्पणात भारताकडून पहिले शतक हे लाला अमरनाथ यांच्या नावे आहे. याशिवाय पदार्पणात सर्वाधिक धावा करण्याचा विक्र धवनच्या खात्यात आहे. 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध गब्बरने 187 धावांची खेळी केली होती. सौरव गांगुली, रोहित शर्मा आणि विरेंद्र सेहवाग यांनी देखील पदार्पणाच्या कसोटी सामन्यात शतक झळकावण्याचा पराक्रम केला होता. घरच्या मैदानात शतकी खेळी करणारा अय्यर 10 वा फलंदाज आहे.

loading image
go to top