India Aim to Clinch T20 Series vs New Zealand
esakal
क्रीडा
IND vs NZ 3rd T20 : टी-२० मालिका विजयाची मोहीम आजच फत्ते? न्यूझीलंडविरुद्ध आज तिसरा सामना; ईशानच्या फॉर्ममुळे संजू अडचणीत...
India Aim to Clinch T20 Series vs New Zealand : न्यूझीलंडविरुद्धच्या मालिका विजयाची मोहीम आज फत्ते करण्याची संधी आहे. पाच सामन्यांतील तिसरा सामना आज होत असून भारतीय धडाकेबाज कामगिरी करतील अशी अपेक्षा आहे.
India get a chance to seal the T20 series against New Zealand : टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा आता मोजक्याच दिवसांवर आलेली असताना न्यूझीलंडविरुद्धच्या मालिका विजयाची मोहीम आज फत्ते करण्याची संधी आहे. पाच सामन्यांतील तिसरा सामना आज होत असून भारतीय धडाकेबाज कामगिरी करीत आहेत. फलंदाजीतील क्षमता भारताची ताकद वाढवत आहे. म्हणूनच शुक्रवारी झालेल्या सामन्यात अभिषेक शर्मा शून्यावर बाद झालेला असताना आणि दोन बाद सहा अशी अवस्था झालेली असतानाही भारताने २०९ धावांचे आव्हान २८ चेंडू शिल्लक ठेवून पार केले होते. यावरून भारतीय फलंदाजी एका खेळाडूवर अवलंबून नाही, हे सिद्ध झाले.
