KS Bharat विकेटमागे अचानक कसा? काय सांगतो नियम?

प्लेइंग इलेव्हनमध्ये नसताना तो विकेट किपिंग कसा करतोय?
ks bharat
ks bharat Sakal
Updated on

न्यूझीलंड विरुद्धच्या कानपूर कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाकडून (Indian Cricket Team) के एस भरत (KS Bharat) यष्टीरक्षण करण्यासाठी मैदानात उतरला. वृद्धिमाना साहाच्या जागी विकेटमागची जबाबदारी केएस भरतकडे देण्यात आलीये. भारतीय संघाने अचानक विकेटमागे केलेल्या बदलामुळे क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. प्लेइंग इलेव्हनमध्ये नसताना तो विकेट किपिंग कसा करतोय? असा प्रश्नही काहींच्या मनात निर्माण झालाय.

वृद्धिमान साहाने दुसऱ्या दिवशी 55 षटके विकेट किपिंग केली होती. मात्र तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीपासूनच केएस भरत याच्याकडे यष्टीमागची जबाबदारी सोपवण्यात आली. बीसीसीआयने ट्विटच्या माध्यमातून साहा ऐवजी भरत मैदानात उतरण्यामागचे कारण स्पष्ट केले आहे.

ks bharat
Viral Video: भरमैदानात राडा... अश्विन अन् अंपायरमध्ये खडाजंगी

बीसीसीआयने आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय की, वृद्धिमान साहा पूर्णपणे फिट नाही. मानेला त्रास होत असल्यामुळे त्याच्यावर उपचार सुरु आहे. तो मेडिकल टीमच्या निरीक्षणाखाली आहे. त्यामुळेच के एस भरतकडे यष्टीमागची जबाबदारी देण्यात आली आहे.

ks bharat
IPL Retention : जड्डूच्या कमेंटवर CSK चा रिप्लाय

राखीव खेळाडूंसंदर्भात नेमका नियम काय?

आयसीसीच्या नियमावलीनुसार, राखीव खेळाडू हा केवळ फिल्डिंगसाठी मैदानात उतरु शकतो. तो बॅट किंवा बॉलसह कॅप्टन्सी करु शकत नाही. पूर्वी सामन्यादरम्यान जर यष्टीरक्षक दुखापतग्रस्त झाला तर प्लेइंग इलेव्हनमध्ये असणाऱ्या गड्यालाच यष्टीमागची जबाबदारी पार पाडावी लागायची. मात्र नव्या नियमानुसार, यष्टीरक्षकाला दुखापत झाल्यास त्याची जागा प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा राखीव खेळाडू घेवू शकतो. याच नियमाअंतर्गत साहाच्या जागी केएस भरतकडे यष्टीमागची जबाबदारी देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com