भारताविरुद्ध दोन सामने गमावल्यानंतर न्यूझीलंडचा माजी खेळाडू म्हणतो,'ही अर्थहीन मालिका' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs NZ

न्यूझीलंड आणि भारत यांच्यात सुरु असलेल्या टी २० मालिकेत पहिले दोन सामने जिंकून तीन सामन्यांची मालिका खिशात घातली आहे.

भारताविरुद्ध पराभव; न्यूझीलंडचा माजी खेळाडू म्हणतो, 'अर्थहीन मालिका'

न्यूझीलंड आणि भारत यांच्यात सुरु असलेल्या टी २० मालिकेत पहिले दोन सामने जिंकून तीन सामन्यांची मालिका खिशात घातली आहे. जयपूर आणि रांचीत झालेल्या दोन्ही सामन्यात न्यूझीलंडला पराभव पत्करावा लागला. यानंतर ट्विटरवर एका युजरनं न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू मिशेल मॅक्लनघनला डिवचलं होतं. त्यावर मॅक्लनघनने उत्तर देताना मालिकेच्या शेड्युलवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

मिशेल मॅक्लनघनने ट्विट करताना म्हटलं की,'वर्ल्ड कपच्या फायनल सामन्यानंतर ७२ तासांनी सुरु झालेली अर्थहिन मालिका, ज्यात ३ सामने ५ दिवसात खेळले जातील. एका संघाला आराम करण्यासाठी आणि मालिकेची तयारी करण्यासाठी घरच्या मैदानावर १० दिवसांचा वेळ मिळतो. तर दुसऱ्या संघाला फक्त ७२ तास.' आधीपासूनच या मालिकेच्या शेड्युलवर प्रश्न विचारले जात होते. त्यामुळेच न्यूझीलंडच्या खेळाडूंनी मालिकेतून नाव मागे घेतलं होतं.

हेही वाचा: 'भेटी लागे जीवा'...धोनीसाठी पठ्ठ्या 1436 KM पायी रांचीत पोहचला

टी २० वर्ल्ड कपमधून भारत बाहेर पडल्यानंतर या मालिकेची तयारी करण्यासाठी भारतीय संघाला १० दिवस मिळाले. तर न्यूझीलंडचा संघ मात्र १४ नोव्हेंबरला अंतिम सामना खेळला. त्यानतंर १७ नोव्हेंबरला ते भारताविरोधात टी २० सामना खेळण्यासाठी मैदानात उतरले. या तीन दिवसात त्यांनी युएईतून जयपूर असा प्रवास केला. त्यानंतर मिळालेला वेळ पुरेस नसल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा टी २० सामना रविवारी कोलकात्यात होणार आहे. भारतीय संघ २-० ने मालिकेत आघाडीवर आहे. टी२० मालिकेनंतर कसोटी मालिका २५ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. कसोटीत खेळण्यासाठी न्यूझीलंडच्या केन विल्यम्सन यांच्यासह अनेक खेळाडूंनी टी२० मालिकेतून माघार घेत विश्रांतीला प्राधान्य दिलं आहे.

loading image
go to top