'भेटी लागे जीवा'...धोनीसाठी पठ्ठ्या 1436 KM पायी रांचीत पोहचला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MS Dhoni With Fan
'भेटी लागे जीवा'...धोनीसाठी पठ्ठ्या 1436 KM पायी रांचीत पोहचला

'भेटी लागे जीवा'...धोनीसाठी पठ्ठ्या 1436 KM पायी रांचीत पोहचला

sakal_logo
By
सुशांत जाधव

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी त्याची क्रेझ अद्यापही कमी झालेली नाही. धोनीची एक झलक पाहण्यासाठी आजही त्याचे चाहते उत्सुक असतात. धोनीचा एक चाहता त्याला भेटण्यासाठी जवळपास 1436 किलोमीटर पायी चालत रांचीमध्ये पोहचला आहे. अजय गिल असे या चाहत्याचे नाव आहे. धोनीच्या प्रेमापोटी त्याने तीन महिन्यात दुसऱ्यांदा ही गोष्ट केलीये.

यापूर्वी ज्यावेळी तो रांचीमध्ये आला होता त्यावेळी धोनी 2021 च्या हंगामातील आयपीएलसाठी युएईमध्ये असल्याच्या त्याला समजले होते. पहिल्यांदा 16 दिवसात पार केलेले अंतर आता अजयने 18 दिवसात पार केले. पण यावेळी त्याची मेहनत वाया गेली नाही. त्याला धोनीला भेटण्याची संधी मिळाली.

हेही वाचा: होय... IPL स्पर्धा आता भारतातच होणार : जय शाह

माही फक्त त्याला भेटला नाही तर परत घरी जाण्यासाठी त्याने आपल्या चाहत्याला विमानाचे तिकीटही काढून दिले. यापूर्वी धोनीने त्याच्यासोबत सेल्फी काढला आणि ऑटोग्राफही दिले. त्याची राहण्याची सोयही धोनीने केली. धोनीची भेट झाल्यामुळे 18 वर्षांच्या या चाहत्याचा आनंद गगनात मावेना झालाय. आयुष्याचे सार्थक झाले, अशी भावना त्याने प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त केली आहे.

हेही वाचा: PAK vs BAN : टीम इंडियापाठोपाठ पाकिस्तानने 2-0 अशी जिंकली मालिका

15 ऑगस्ट रोजी धोनीने अचानकपणे निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर या चाहत्याने क्रिकेट खेळणंच बंद केले होते. जोपर्यंत धोनीला भेटणार नाही तोपर्यंत क्रिकेट खेळणार नाही, अशी शपथच या अवलियाने घेतली होती. अजय हा मुळचा हरियाणाचा असून तो भारतीय संघात खेळण्याचे स्वप्न बाळगून आहे. हरियाणा ते झारखंड तो पायी चालत आला होता.

loading image
go to top