INDvsNZ : हवा कुणाची रं? फक्त फास्टर्सची रं!

India vs new zealand test match will depend on performance of pacers
India vs new zealand test match will depend on performance of pacers

वेलिंग्टन : भारत आणि न्यूझीलंड संघादरम्यान मालिका दोनच कसोटी सामन्यांची आहे पण त्याला क्रिकेटची धार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या द़ृष्टीने ही मालिका महत्त्वाची आहे. मोठ्या कालखंडानंतर भारतीय संघ दर्जेदार प्रतिस्पर्ध्यांसमोर परदेशात कसोटी सामना खेळणार आहे. वेलिंग्टन शहरातील चारही बाजूंनी खुल्या ऐतिहासिक बेसीन रिझर्व्ह मैदानावर हा सामना रंगणार आहे. दोनही बाजूंकडे दर्जेदार फलंदाजांची नामावली असली तरी जाणकारांच्या मते सामन्याची दिशा वेगवान गोलंदाजांची कामगिरी ठरवणार.

जगात दोन शहरांना ‘वार्‍याची शहरे’ म्हणले जाते. एक आहे दक्षिण आफ्रिकेतील पोर्ट एलिझाबेथ आणि दुसरे आहे न्यूझीलंड मधील वेलिंग्टन. त्यातून सामना होणार ते बेसीन रिझर्व्ह मैदान माउंट कुक या मोठ्या टेकडीच्या पाठिंब्याने नटलेले आणि चारही बाजूंनी खुले असल्याने वाहत्या वार्‍याचे आहे. याच वाहत्या वार्‍याचा परिणाम क्रिकेट सामन्यावर होतो. 2014साली भारतीय संघ कसोटी सामना जिंकायच्या वाटेवर असताना ब्रँडन मॅक्कुलमने त्रिशतक ठोकून सामना अनिर्णीत राखायला भाग पाडले. याचा अर्थ असा की बेसीन रिझर्व्हचे मैदान फक्त गोलंदाजांना मदत करते असे अजिबात नाही. खेळपट्टी हिरवी दिसत असली तरी चेंडू खूप काही करतो असे फक्त चेंडूवर लकाकी असताना होते. एकदा का चेंडू थोडा जुना झाला की फलंदाज आपले फटके मारू शकतो.

भारतीय संघातून पृथ्वी शॉला सलामीच्या जागेकरता पसंती मिळणार असल्याचे संकेत विराट कोहलीने दिले आहेत. म्हणजेच एकमेव फिरकी गोलंदाज कोण खेळणार हाच एक प्रश्न संघ निवडीच्या बाबतीत अनुत्तरित राहतो. 6व्या क्रमांकावर हनुमा विहारी आणि तीन वेगवान गोलंदाजांचे त्रिकूट बुमरा - शमी - ईशांत असेल असे वाटते. माध्यमे रिषभ पंत बाबत परत बोलू लागली असली तरी विकेट किपर म्हणून वृद्धिमान साहाला पसंती मिळेल असे वाटते.

न्यूझीलंड संघाच्या गोलंदाजीची भिस्त ट्रेंट बोल्ट, टीम साउदी आणि एजाज पटेल सांभाळतील असे दिसते आहे. टॉम लॅथम आणि हेन्री निकल्स करतील. 100वा कसोटी सामना खेळणारा रॉस टेलर कशी कामगिरी करतो याकडे किवी प्रेक्षकांचे बारीक लक्ष असेल. गेल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंड संघाचा खेळ अपेक्षापूर्ती करणारा झालेला नाही. परिणामी केन विल्यमसनच्या कर्णधारपदावरही टीकाकार नजर ठेवून आहेत. विल्यमसन त्याला कसे उत्तर देतो हे बघायला बेसीन रिझर्व्ह मैदानावर प्रेक्षक जमा होतील अशी आशा संयोजक बाळगून आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com