सिंधू, प्रणीतचा झंझावात; श्रीकांतचे आव्हान संपुष्टात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिंधू, प्रणीतचा झंझावात; श्रीकांतचे आव्हान संपुष्टात
सिंधू, प्रणीतचा झंझावात; श्रीकांतचे आव्हान संपुष्टात

सिंधू, प्रणीतचा झंझावात; श्रीकांतचे आव्हान संपुष्टात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बाली : भारताची दुहेरी ऑलिंपिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू व साई प्रणीत या दोघांनी गुरुवारी इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील एकेरी गटामध्ये दिमाखदार खेळ केला आणि आगेकूच केली. किदांबी श्रीकांतला मात्र एकेरीच्या लढतीत पराभवाला सामोरे जावे लागल्यामुळे त्याचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

हेही वाचा: आता विभाजीत भारताला अखंडित बनवायला हवं - मोहन भागवत

पी. व्ही. सिंधूने महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीतील लढतीत जर्मनीच्या यव्होन लीवर सरळ सेटमध्ये २१-१२, २१-१८ असा विजय मिळवला. यव्होन लीविरुद्ध पी. व्ही. सिंधूने सुरुवातीपासूनच पूर्ण नियंत्रण ठेवले आणि अवघ्या ३७ मिनिटांत विजय मिळवला. ‘फुलराणी’ पी. व्ही. सिंधूने पहिला गेम अगदी सहज जिंकला.यव्होन लीने दुसऱ्या गेममध्ये चांगले पुनरागमन करताना चांगली झुंज दिली परंतु; पी. व्ही. सिंधूने चिकाटी राखली आणि लीला हरवले. साई प्रणीतने ख्रिस्तो पोपोवचे खडतर आव्हान तीन गेममध्ये परतवून लावले. साई प्रणीतने पहिला गेम २१-१७ अशा फरकाने जिंकला; पण दुसऱ्या गेममध्ये प्रतिस्पर्धी खेळाडूने २१-१४ अशा फरकाने बाजी मारली. मात्र अखेरच्या गेममध्ये साई प्रणीत याने आपला खेळ उंचावत २१-१९ अशा फरकाने विजय संपादन केला.

हेही वाचा: बापरे! भारत-पाक सामना एवढ्या लोकांनी पाहिला; Viewership चा नवा विक्रम

दुहेरीत मिळाला विजय

भारतीय बॅडमिंटनपटूंनी गुरुवारी दुहेरीत विजय मिळवला. चिराग शेट्टी व सात्विक रेड्डी या जोडीने कँग मिनह्यूक - सिओ सिऑनगे या जोडीवर रोमहर्षक विजय मिळवला. भारताच्या जोडीने ही लढत २१-१५, १९-२१, २३-२१ अशा फरकाने जिंकली आणि या स्पर्धेमध्ये पुढे पाऊल टाकले.

loading image
go to top