Paris Saint Germain | Champions League : पराभवानंतरही PSG संघ पुढल्या फेरीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Leonel-Messi

मँचेस्टर सिटीसह, रिअल माद्रिद, इंटर मिलान, लिस्बनचीही कूच

Champions League : पराभवानंतरही PSG संघ पुढल्या फेरीत

sakal_logo
By
विराज भागवत

पॅरिस : चॅम्पियन्स लीग ही जगातील प्रतिष्ठेची फुटबॉल स्पर्धा आता रंगात आली आहे. युरोप खंडातील क्लब अंतिम १६ मध्ये प्रवेश करण्यासाठी सर्वस्व पणाला लावत आहेत. मँचेस्टर सिटी व पॅरिस सेंट जर्मेन (पीएसजी) यांच्यामध्ये बुधवारी रात्री लढत पार पडली. या लढतीतील दोन्ही संघांनी अंतिम १६ फेरीमध्ये प्रवेश केला. मँचेस्टर सिटीने स्टार खेळाडूंनी सजलेल्या पीएसजीला २-१ अशा फरकाने हरवले आणि पुढल्या फेरीत प्रवेश केला. पराभवानंतरही पीएसजीला आगेकूच करता आली हे विशेष. या दोन संघांसह रिअल माद्रिद, इंटर मिलान व स्पोर्टींग लिस्बन या क्लब्सनेही स्पर्धेत घोडदौड केली.

हेही वाचा: IND vs NZ: कानपूरच्या मैदानात पाकिस्तान विरुद्ध घोषणाबाजी; व्हिडिओ व्हायरल

मँचेस्टर सिटी-पीएसजी यांच्यामधील लढतीच्या पूर्वार्धात दोन्ही संघांना गोल करता आला नाही. त्यामुळे गोलशून्य बरोबरी झाली, पण ५०व्या मिनिटाला किलीयन एम्बाप्पे याने गोल करीत पीएसजीला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर रहीम स्टर्लींगने ६३ व्या मिनिटाला गोल करीत मँचेस्टर सिटीला १-१ अशी बरोबरी साधून दिली. अखेर गॅब्रीयल जेसस याने ७६ व्या मिनिटाला गोल करीत मँचेस्टर सिटीला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. ही आघाडी त्यांनी अखेरपर्यंत कायम ठेवली आणि विजय मिळवला.

हेही वाचा: IND vs NZ Test: श्रेयसला संघात स्थान; रिकी पॉन्टींग म्हणतो...

१२ वर्षांनंतर बाद फेरीत

स्पोर्टींग लिस्बन या क्लबने बोरुसिया डोर्टमंडला ३-१ अशा फरकाने हरवत चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या पुढल्या फेरीत प्रवेश केला. या स्पर्धेच्या बाद फेरीत पोहोचण्याची स्पोर्टींग लिस्बनची ही गेल्या १२ वर्षांमधील पहिलीच खेप. याआधी २००८-०९ सालामध्ये स्पोर्टींग लिस्बनने बाद फेरी गाठली होती.

हेही वाचा: IND vs NZ 1st Test : अजिंक्यनं टॉस जिंकला, अय्यरला पदार्पणाची संधी

...पण फुटबॉलच्या मैदानात गोल

रिअल माद्रिद संघाने बुधवारी रात्री शेरीफ संघाला ३-० अशा फरकाने धूळ चारली आणि अंतिम १६ फेरीत पाऊल टाकले. करीम बेन्जेमा याने ५५व्या मिनिटाला गोल करीत आपली चुणूक दाखवली. काही तासांपूर्वी फ्रान्सच्या कोर्टाकडून त्याला दोषी ठरवण्यात आले आहे. त्यानंतरही त्याने आपल्या क्लबसाठी गोल करीत विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली.

loading image
go to top