India Vs Pakistan:'जर तुम्हाला जिंकता नसेल तर...',पाकिस्तानच्या दिग्गजाकडून बाबरची खरडपट्टी

दिग्गज पाकिस्तानी खेळाडू रमीझ राजा यांनी देखील लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तानी संघावर ताशेरे ओढले आहेत. यावेळी त्यांनी पाकिस्तानी संघाला एक विनंती देखील केली.
India Vs Pakistan:'जर तुम्हाला जिंकता नसेल तर...',पाकिस्तानच्या दिग्गजाकडून बाबरची खरडपट्टी

Ramiz Raja on Pakistan Defeat: भारत आणि पाकिस्तान संघामध्ये शनिवारी (दि. १४ ऑक्टोबर) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर एकदिवसीय विश्वचषकाचा सामना खेळवला गेला. या सामन्यात पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव झाला. भारताने पाकिस्तानवर ७ गडी राखून विजय मिळवल्यानंतर, विश्वचषकापुर्वी पाकिस्तान संघाचे गोडवे गाणारे पाकिस्तानी दिग्गज आता संघाची खरडपट्टी काढत आहेत. दिग्गज पाकिस्तानी खेळाडू रमीझ राजा यांनी देखील लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तानी संघावर ताशेरे ओढले आहेत. यावेळी त्यांनी पाकिस्तानी संघाला एक विनंती देखील केली.

भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तान हतबल झालेला पाहून रमीझ राजा यांनी पाकिस्तानी संघाचे कान टोचले. ते म्हणाले की, "हे पाकिस्तानी लोकांच्या भावना दुखावणार आहे. जेव्हा तुम्ही भारताविरोधात खेळत असाल, तेव्हा तुम्हाला माहिती हवं की ९९ टक्के भारतीय मैदानात भारताला पाठिंबा देणारे आहेत, ज्याचा परिणाम तुमच्यावर नक्की होणार आहे. तुम्ही भारवून जाणार हे देखील मला समजतं. जर तुम्हाला जिंकता येत नसेल तर, निदान तुम्ही स्पर्धा तरी केली पाहिजे."

भारत आणि पाकिस्तान संघात विश्वचषक स्पर्धेत खेळवल्या गेलेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर ७ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. पाकिस्तान संघाने सुरुवात मजबूत केली होती. त्यांच्या १५२ धावसंख्येवर फक्त दोन फलंदाज बाद होते. मात्र, नंतर पाकिस्तानची अवस्था १९१ धावसंख्येवर सर्वबाद अशी झाली.

भारताला मिळालेलं हे आव्हान भारताने सहज प्राप्त केले. यामध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्मा याता मोलाचा वाटा होता. त्याने पाकिस्तान संघाच्या गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला. रोहित शर्माने ८६ धावा केल्या,ज्यात त्याच्या गगनचुंबी ६ षटकारांचा समावेश होता. (Latest Marathi News)

India Vs Pakistan:'जर तुम्हाला जिंकता नसेल तर...',पाकिस्तानच्या दिग्गजाकडून बाबरची खरडपट्टी
Ajit Pawar: मीरा बोरवणकरांच्या 'मॅडम कमिशनर' पुस्तकातून अजित पवारांवर गंभीर आरोप!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com