IND VS PAK: भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने! आशियाई क्रीडा स्पर्धेतील हॉकी महामुकाबला कधी, कुठे, किती वाजता? LIVE कुठे पाहायचा?

INDIA VS PAKISTAN HOCKEY SEMI FINAL LIVE STREAMING: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत-पाकिस्तान हॉकीची उपांत्य लढत रंगणार आहे. भारताने साखळी फेरीतील पाचही सामने जिंकत अ गटात अव्वल स्थान मिळवलं. आता १ ऑक्टोबरला होणाऱ्या सेमीफायनलमध्ये सामना कधी, कुठे, किती वाजता आणि फ्रीमध्ये कुठे पाहता येणार, जाणून घ्या.
INDIA VS PAKISTAN HOCKEY SEMI FINAL LIVE STREAMING

INDIA VS PAKISTAN HOCKEY SEMI FINAL LIVE STREAMING

esakal

Updated on: 

INDIA VS PAKISTAN HOCKEY SEMI FINAL LIVE STREAMING: भारत आणि पाकिस्तान(INDIA VS PAKISTAN) म्हटलं की सामना कोणताही असो, उत्सुकता ही शिगेला पोहोचते म्हणजे पोहोचते. भारत-पाकिस्तान सामन्यासाठी चाहतेही प्रत्येक वेळी वाट पाहत असतात. आता भारतीय पुरुष हॉकी संघ आणि पाकिस्तान हॉकी संघ यांच्यात आशियाई क्रीडा स्पर्धेतील उपांत्य लढत रंगणार आहे.

भारतीय संघाने अ गटातील साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात बांगलादेशचा १०-० असा धुव्वा उडवला. या विजयासह भारताने अ गटात पाचपैकी पाचही सामने जिंकत १० गुणांसह पहिले स्थान मिळवलं आहे. त्यामुळे आता भारत-पाकिस्तान सामन्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com