World Cup 2019 : भारतीय चाहता म्हणतोय ओल्ड ट्रॅफर्डवर आमचीच हवा

रणजित पांडे
रविवार, 16 जून 2019

अख्खं मॅरिएट फक्त आणि फक्त भारतीय चाहत्यांनी भरलेलं... गेले दोन दिवस चाहते स्वत:साठी स्पेशल जर्सी, भारत-पाक सामन्याचे फलक बनण्यात गुंग.. आणि दोन दिवस सुरु असलेला पाऊस.. भारत-पाक सामन्यापूर्वीची ही परिस्थिती. 

वर्ल्ड कप 2019 : मॅंचेस्टर : अख्खं मॅरिएट फक्त आणि फक्त भारतीय चाहत्यांनी भरलेलं... गेले दोन दिवस चाहते स्वत:साठी स्पेशल जर्सी, भारत-पाक सामन्याचे फलक बनण्यात गुंग.. आणि दोन दिवस सुरु असलेला पाऊस.. भारत-पाक सामन्यापूर्वीची ही परिस्थिती. 

ओल्ड ट्रॅफर्ड आमच्या हॉटेलपासून केवळ 10 मिनिटांच्या अंतरावर आहे. गेले दोन दिवस प्रत्येक भारतीय चाहता फक्त आणि फक्ता आजची वाट पाहत आहे. दोन दिवस सलग पाऊस सुरु असल्याने आमच्या मनातही सामना होणार की नाही अशी धाकधूक होती. आज सकाळीही थोडा पाऊस पडून गेला मात्र, आता पाऊस थांबला असून ढगाळ वातावरण आहे. मात्र, आम्हाला खात्री आहे की सामना होणारच.

भारत-पाकिस्तान सामना वेळेवर सुरु होणार आहे. मात्र हा सामना 50 षटकांचा होणार की नाही हे अद्याप निश्चित नाही. कारण सायंकाळी 5-7च्या सुमारास पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India vs Pakistan match preview from Manchester