PAK vs HK : ठरलं! रविवारी भारत-पाकिस्तान भिडणार, हाँगकाँगला 38 धावात गुंडळात पाक सुपर 4 मध्ये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

India vs Pakistan on 4th September Asia Cup 2022 Super

PAK vs HK : ठरलं! रविवारी भारत-पाकिस्तान भिडणार, हाँगकाँगला 38 धावात गुंडळात पाक सुपर 4 मध्ये

Asia Cup 2022 Pakistan Vs Hong Kong : आशिया कपच्या ग्रुप A मधील सामन्यात पाकिस्तानने हाँगकाँगला 38 धावात गुंडाळात सुपर 4 मध्ये प्रवेश केला. पाकिस्तानने सामना तब्बल 155 धावांनी जिंकला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत हाँगकाँगसमोर 194 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र हाँगकाँगचा संपूर्ण संघ 10.4 षटकात 38 धावात गारद झाला. पाकिस्तानकडून शादाब खानने 4 तर मोहम्मद नवाझने 3 विकेट घेतल्या. या दोघांना नसीम शाहने 2 विकेट घेत चांगली साथ दिली. शहानवाज दहानीने देखील 1 विकेट घेतली. हाँगकाँगकडून एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. हाँगकाँगकडून कर्णधार निझाकत खानने सर्वाधिक 13 चेंडूत 8 धावा केल्या.

हेही वाचा: PAK vs HK : रिझवानची झुंजार खेळी तर खुशदीलचा तडाखा; हाँगकाँगसमोर 194 धावांचे मोठे आव्हान

आशिया कप ग्रप A च्या शेवटच्या सामन्यात पाकिस्तानने हाँगकाँग विरूद्धच्या सामन्यात 20 षटकात 2 बाद 193 धावा चोपल्या. पाकिस्तानकडून सलामीवीर 57 चेंडूत नाबाद 78 धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याला फखर झमानने 41 चेंडूत 53 धावांची खेळी करून चांगली साथ दिली.

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या हाँगकाँगने पाकिस्तानचा कर्णधार बाबार आझमला स्वस्तात माघारी धाडत दमदार सुरूवात केली. एहसान खानने बाबर आझमला 9 धावांवर बाद केले. त्यानंतर सलामीवीर मोहम्मद रिझवान आणि फखर झमानने सावध फलंदाजी करत पॉवर प्लेमध्ये 40 धावांपर्यंत मजल मारली. दरम्यान, 10 षटकापर्यंत पाकिस्तानची धावगती 6 च्या आसपास होती.

हेही वाचा: Jonny Bairstow : बेअस्टोचा गोल्फ खेळताना विचित्र अपघात; टी 20 वर्ल्डकपला मुकला

मात्र त्यानंतर मोहम्मद रिझवान आणि फखर झमानने आक्रमक फलंदाजी करण्यास सुरूवात केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 116 धावांची शतकी भागीदारी रचली. पाकिस्तानच्या 16.1 षटकात 129 धावा झाल्या असताना अर्धशतकी खेळी केलेला फखर झमान (53) बाद झाला. त्यालाही एहसान खाननेच बाद केले.

त्यानंतर मोहम्मद रिझवानने आक्रमक फलंदाजी करण्यास सुरूवात केली. त्याला खुशदील शाहने 15 चेंडूत नाबाद 35 धावा चोपून चांगली साथ दिली. खुशदीलने आपल्या 35 धावांमधील 30 धावा या षटकाराने केल्या. रिझावान आणि खुशदीलने तिसऱ्या विकेटसाठी 23 चेंडूत 64 धावांची आतशी भागीदारी रचत पाकिस्तानला 193 धावांपर्यंत पोहचवले. रिझवानने 57 चेंडूत 78 धावांची खेळी केली.

Web Title: India Vs Pakistan On 4th September Asia Cup 2022 Super 4 Pakistan Bundle Up Hongkong In 38 Runs

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..