Jonny Bairstow : बेअस्टोचा गोल्फ खेळताना विचित्र अपघात; टी 20 वर्ल्डकपला मुकला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jonny Bairstow T20 World Cup

Jonny Bairstow : बेअस्टोचा गोल्फ खेळताना विचित्र अपघात; टी 20 वर्ल्डकपला मुकला

England T20 World Cup Squad Jonny Bairstow : इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज जॉनी बेअरस्टोला टी 20 वर्ल्डकप अगदी जवळ असताना दुखापत झाली आहे. त्याचा गोल्फ खेळताना विचित्र अपघात झाला. या अपघातात त्याला दुखापत झाली. त्यामुळे तो इंग्लंडचा उरलेला उन्हाळी हंगाम मुकणार आहे. विशेष म्हणजे तो ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपला देखील मुकला आहे. (Jonny Bairstow Freak Accident During Playing Golf)

हेही वाचा: England T20 World Cup Squad : इंग्लंडचा संघ जाहीर! जेसन रॉयला डच्चू, मुंबईच्या आर्चरलाही नाही स्थान

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने शुक्रवारी एक वक्तव्य प्रसिद्ध केले. यात 'इंग्लंड आणि यॉर्कशायरचा फलंदाज जोनाथन बेअरस्टो उर्वरित उन्हाळी हंगाम आणि आयसीसी टी 20 वर्ल्डकपला मुकणार आहे. बेअरस्टोचा लीड्समध्ये गोल्फ खेळताना एक विचित्र अपघात झाला. या अपघातात त्याच्या पायाला दुखापत झाली.' अशी माहिती देण्यात आली.

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने बेअरस्टो पुढच्या आठवड्यात दुखापतीबाबत तज्ज्ञांना सल्ला घेणार आहे. त्यावेळी त्याची दुखापत किती गंभीर आहे याचा अंदाज येईल असे सांगिले. दरम्यान, बेन डकेट्सला दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघात घेण्यात आले आहे. मात्र टी 20 वर्ल्डकपसाठी बेअरस्टोच्या जागी कोणाला संधी देण्यात येईल याचा खुलासा अजून करण्यात आलेला नाही.

हेही वाचा: Dhanashree Verma : युझवेंद्रची पत्नी धनश्री रूग्णालयात दाखल! चाहत्यांसाठी दिला खास संदेश

इंग्लंडचा टी 20 वर्ल्डकप, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील संघ :

जॉस बटलर, मोईन अली, जोनाथन बेअरस्टो (दुखापतीमुळे बाहेर), हॅरी ब्रुक, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, आदिल राशिद, फिल सॉल्ट, बेन स्टोक्स, रीस टॉपली, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स आणि मार्क वूड.

स्टँडबाय खेळाडू :

टायमर मिल्स, लियाम डॉसन, रिचर्ड ग्लीसन

Web Title: Jonny Bairstow Freak Accident During Playing Golf Ruled Out For T20 World Cup 2022 Australia

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..