India Vs Pakistan : मी सांगू इच्छिते की... भारतातून काढता पाय घेणारी पाकिस्तानी पत्रकार अखेर बोलली

India Vs Pakistan
India Vs Pakistan esakal

India Vs Pakistan : भारत - पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामन्यापूर्वी पाकिस्तानचा प्रसिद्ध महिला पत्रकार जैनब अब्बासची भारतातून हकालपट्टी करण्यात आली होती असे वृत्त आले होते. जैनब या वर्ल्डकप 2023 चे वार्तांकन करण्यासाठी भारतात आली होती. मात्र तिला आपल्या जुन्या पोस्टमुळे भारत सोडावा लागला.

तिने जुन्या पोस्टमध्ये हिंदू देवी देवतांवर अभद्र टिप्पणी केली होती. यावरून भारतात गदारोळ सुरू झाल्यानंतर त्यांनी भारत सोडण्याचा निर्णय घेतला. अनेक दिवस शांत असलेल्या जैनबने आता या प्रकरणी आपले वक्तव्य दिले आहे.

India Vs Pakistan
Rohit Sharma: विश्वचषकासाठी रोहित शर्माचा काय आहे प्लॅन? म्हणाला, विक्रमांचा...

जैनब अब्बासने मागितली माफी

जैनब अब्बसने आपल्या एक्स (ट्विटवर) अकाऊंटवरून एक भली मोठी पोस्ट करत माफी मागितली. त्या आपल्या जुन्या पोस्टबद्दल माफी मागताना म्हणाल्या, 'मी स्पष्ट करू इच्छिते की ती जुनी पोस्ट माझे मुल्य आणि आज मी जी व्यक्ती आहे ते दर्शवत नाही. अशा प्रकारच्या भाषेबद्दल कोणतीही सबब देता येणार नाही. जे कोणी दुखावले गेले आहेत त्यांची मी माफी मागते.'

India Vs Pakistan
IND vs PAK World Cup 2023 : लाल की काळी माती; नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी कोणाला देणार साथ?

स्वत:च भारत सोडण्याचा घेतला निर्णय

जैनब अब्बासने या पोस्टसोबतच आपण भारतातून स्वतःच बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. जैनबने पोस्टमध्ये लिहिले की, 'मला कोणी जाण्यास सांगितले किंवा मला डिपोट करण्यात आलं आहे. मात्र ज्या प्रकारे ऑनलाईन प्रतिक्रिया समोर आल्या त्यामुळे मी घाबरले. माझ्या सुरक्षेला कोणताही धोका नव्हता. मात्र माझे कुटुंबीय आणि दोन्ही देशातील मित्र चिंतेत होते. जे काही झालं त्यावर थोडा विचार करण्यासाठी मला थोडा वेळ हवा होता.'

पाकिस्तानने 2023 वर्ल्डकपमधील आपला पहिला सामना हा 6 ऑक्टोबरला खेळला होता. नेदरलँडविरूद्धचा हा सामना हैदराबाद येथे खेळला गेला. या सामन्यादरम्यान जैनब अँकरिंग करताना दिसली होती. मात्र पाकिस्तानच्या दुसऱ्या सामन्यावेळी ती दिसली नाही.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com