Sports News: आजही भारत-पाक आमनेसामने ;तिलक वर्माच्या टीम इंडियाचे पारडे चांगलेच जड

India vs Pakistan Rising Stars : आशिया करंडक रायझिंग स्टार्स स्पर्धेत उद्या भारत-पाकिस्तान आमनेसामने येणार; २०२३ मधील पराभवाची परतफेड करण्यासाठी तिलक वर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सज्ज
India and Pakistan players set for a thrilling clash in the Rising Stars Asia Cup cricket tournament.

India and Pakistan players set for a thrilling clash in the Rising Stars Asia Cup cricket tournament.

esakal

Updated on: 

दोहा : करातमधीलच अल अमेरत येथे गेल्या आठवड्यात झालेल्या थरारक सामन्यात भारतीय युवकांनी पाकिस्तानचा पराभव करून १९ वर्षांखालील आशिया करंडक स्पर्धेत विजेतेपद मिळवले होते. उद्या आशिया करंडक रायझिंग स्टार्स क्रिकेट स्पर्धेतही भारत-पाकिस्तान सामना होत आहे.

बीसीसीआयने या स्पर्धेसाठी तिलक वर्माच्या नेतृत्वाखाली ताकदवर संघ निवडला आहे. शुक्रवारी झालेल्या सलामीच्या सामन्यात या संघाने जपानचा ३०६ धावांनी मोठा पराभव केला. त्या वेळी पाकिस्तानने त्यांच्या सलामीच्या सामन्यात संयुक्त अरब अमिराती संघावर ६१ धांवांनी मात केली असली, तरी उद्याच्या सामन्यात भारतीयांचे पारडे जड आहे.

Loading content, please wait...