IND vs PAK: भारत-पाकिस्तान यांच्यात होणार कसोटी मालिका?, इंग्लंड बोर्डाने दिली ऑफर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

India vs Pakistan Test Series In England

IND vs PAK: भारत-पाकिस्तान यांच्यात होणार कसोटी मालिका?, इंग्लंड बोर्डाने दिली ऑफर

India vs Pakistan Test Series In England : क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. रिपोर्टनुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यात कसोटी मालिका खेळल्या जाणार आहे. टेलिग्राफच्या रिपोर्टनुसार इंग्लंड क्रिकेट बोर्डाने भारत विरुद्ध पाकिस्तान कसोटी मालिका इंग्लंडमध्ये आयोजित करण्याची ऑफर दिली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात जवळपास दशकभरात कोणतीही द्विपक्षीय मालिका झालेली नाही.

हेही वाचा: Rishabh Pant : टीम इंडियाकडून ऋषभ पंतला Ignore; 'त्या' व्हिडीओमुळे...

भारत आणि पाकिस्तानमध्ये 2012 पासून कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळली गेली नाही. 2012 मध्ये पाकिस्तानचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. या दौऱ्यात टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळवण्यात आली. मात्र त्यानंतर दोन्ही देशांमधील राजकीय तणाव सातत्याने वाढत गेला. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय मालिका झाली नाही. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कसोटी मालिकेबद्दल बोलायचे झाल्यास 2008 पासून दोन्ही संघांमध्ये एकही कसोटी मालिका खेळली नाही.

हेही वाचा: Sanju Samson : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संजू टीम इंडियाचा उपकर्णधार?

भारत आणि पाकिस्तान फक्त आशिया कप आणि आयसीसी टूर्नामेंटमध्येच आमने-सामने येतात. आशिया कप 2022 मध्ये भारत आणि पाकिस्तान दोनदा आमनेसामने आले होते. यामध्ये एक मॅच टीम इंडियाने जिंकली होती तर एका मॅचमध्ये पाकिस्तानने बाजी मारली होती. आता पुन्हा एकदा आयसीसी 2022 टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना पाहायला मिळणार आहे. हा सामना 23 ऑक्टोबरला होणार आहे. याआधी 2021 च्या T20 विश्वचषकात दोन्ही संघ आमनेसामने आले होते, तेव्हा पाकिस्तानने भारताचा 10 विकेट्सने पराभव केला होता.