लक्ष्मण होणार इंडियाचा हेड कोच? द्रविडच्या जागी मिळणार मोठी जबाबदारी

व्हेरी व्हेरी स्पेशल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लक्ष्मणची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदी नियुक्तीची घोषणा होऊ शकते.
india vs sa t20 series team india coach rahul dravid
india vs sa t20 series team india coach rahul dravid

आयपीएल 2022 संपल्यानंतर टीम इंडियाला आफ्रिका संघाविरुद्ध 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. त्याआधीच व्हीव्हीएस लक्ष्मणबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 9 जून ते 19 जून दरम्यान टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. त्याआधी टीम इंडियाच्या कोचिंगची जबाबदारी व्हीव्हीएस लक्ष्मणकडे दिल्याच्या बातम्या समोर येत आहेत. (india vs sa t20 series team india coach rahul dravid)

india vs sa t20 series team india coach rahul dravid
SRH ला धक्का, कॅप्टन केन विल्यमसन मायदेशी परतला, काय आहे कारण?

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या टी-20 मालिका आणि आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी व्ही.व्ही.एस लक्ष्मणला भारतीय संघाचे प्रशिक्षक बनवले जाऊ शकते. भारताला 26 जून ते 28 जून दरम्यान आयर्लंडविरुद्ध दोन सामन्यांची टी-20 मालिका खेळायच्या आहे.

india vs sa t20 series team india coach rahul dravid
'कुंबळेला हाकला, संघ वाचवा', पंजाबच्या खराब कामगिरीवर चाहते संतापले

दरम्यान भारतीय संघाचे नियमित प्रशिक्षक राहुल द्रविड 15 किंवा 16 जून रोजी वरिष्ठ खेळाडूंच्या संघासह इंग्लंड दौऱ्यावर रवाना होऊ शकतात. येथे भारताला 1 कसोटी, 3 एकदिवसीय सामने आणि 3 सामन्यांची T20 मालिका खेळायची आहे. त्यामुळे राहुल द्रविड त्या मध्ये खूप व्यस्त असणार आहे. द्रविड सर्व मालिकांसाठी उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळेच व्हीव्हीएस लक्ष्मणकडे ही जबाबदारी दिल्याची चर्चा आहे.

india vs sa t20 series team india coach rahul dravid
CSK संघाची 2023 मधील धूरा 4 विदेशी खेळाडूंच्या हाती?

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या टी-20 मालिकेत वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते, त्यामध्ये शिखर धवनकडे युवा टीम इंडियाचे कर्णधारपद सोपवले जाऊ शकते. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या टी-20 मालिकेत निवडकर्ते अधिकाधिक युवा खेळाडूंना घेऊ शकतात. केएल राहुल, जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा, विराट कोहली आणि ऋषभ पंत हे खेळाडू इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार्‍या टीम इंडियाचे नियमित प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासह वरिष्ठ संघाचा भाग असतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com