AFC Asian Cup
sakal
क्रीडा
AFC Asian Cup: यजमान भारतीय फुटबॉल संघाने आघाडीनंतर संधी दवडली; आशिया करंडक पात्रता लढत, सिंगापूर संघाचा पिछाडीवरून २-१ असा विजय
India vs Singapore AFC Asian Cup Qualifiers: सामन्याच्या आरंभी लाल्लियानझुआला छांगटे याच्या गोलमुळे आघाडी घेऊन काही काळ वर्चस्व गाजवलेल्या भारतीय फुटबॉल संघाला नंतर संधी साधणे शक्य झाले नाही.
पणजी : सामन्याच्या आरंभी लाल्लियानझुआला छांगटे याच्या गोलमुळे आघाडी घेऊन काही काळ वर्चस्व गाजवलेल्या भारतीय फुटबॉल संघाला नंतर संधी साधणे शक्य झाले नाही. साँग युईयाँग याच्या दोन शानदार गोलमुळे सामना २-१ फरकाने जिंकून सिंगापूरने आशिया करंडक फुटबॉल स्पर्धेच्या पात्रता फेरीतील आव्हान कायम राखले, तर पराभवामुळे खालिद जमील यांच्या मार्गदर्शनाखालील संघाचे आव्हान संपल्यातच जमा आहे.

