Ind vs Sa 1st ODI: पावसावर सामन्याचे भवितव्य, आफ्रिकेविरुद्ध आजपासून एकदिवसीय मालिका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

india vs south africa 1st odi match lucknow

Ind vs Sa 1st ODI: पावसावर सामन्याचे भवितव्य, आफ्रिकेविरुद्ध आजपासून एकदिवसीय मालिका

India vs South Africa 1st ODI Match lucknow : ट्वेन्टी-२० मालिका संपली आणि भारतीय संघ टी-२० विश्वकरंडक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाला आज रवाना झाला आहे, मात्र दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतातच असून तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. दोन देशांमधील पहिला सामना आज होत आहे.

हेही वाचा: T20 World Cup: रोहित शर्मा अँड कंपनी ऑस्ट्रेलियाला रवाना, 15 वर्षांचा दुष्काळ संपणार!

भारताचा मुख्य संघ नसल्यामुळे इतर खेळाडूंना या मालिकेत खेळण्याची संधी मिळणार आहे. मुकेश कुमार आणि रजत पाटीदार यांना प्रथमच भारतीय संघात स्थान मिळाले आहे. ही मालिका ५०-५० षटकांची असली तरी त्यातील कामगिरीवर निवड समितीचे लक्ष असणार आहे. श्रेयस अय्यरची विश्वकरंडक स्पर्धेसाठी राखीव खेळाडूत निवड झालेली असली तरी तो आफ्रिकेविरुद्धच्या या मालिकेत उपकर्णधार आहे. त्याचप्रमाणे दीपक चहर आणि रवी बिश्नोई हे सुद्धा या मालिकेत खेळणार आहेत.

शिखर धवन नेतृत्व करत असलेल्या या मालिकेत शुभमन गिल सलामीला फलंदाज असेल. त्यानंतर राहुल त्रिपाठी किंवा पाटीदार यापैकी एकाला पदार्पण करण्याची संदी मिळेल. ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन आणि इशान किशन यांनाही प्रभाव पाडण्याची संधी आहे.

हेही वाचा: Suryakumar Yadav : सूर्याची चिंता वाढली; चौथ्या क्रमांकावर टांगती तलवार

डेन्टी-२० मालिकेत खेळण्याची संधी न मिळालेला शहाबाझ अहमद, विश्नोई आणि कुलदीप यादव यांच्यावर फिरकीची मदार असेल. नव्या चेंडूची जबाबदारी शार्दूल ठाकूर, दीपक चहर, आवेश शान आणि मोहम्मद सिराज यांच्यावर आहे.

पावसाचा व्यत्यय अपेक्षित

दोन्ही संघ चांगल्या कामगिरीसाठी प्रयत्नशील असले तरी पावसावर सामन्याचे भवितव्य अवलंबून आहे. गेल्या काही दिवसांपासून येथे जोरदार पाऊस होत आहे आणि आजही पावसाचे भाकीत करण्यात आले आहे. मालिकेतील पुढचे दोन सामने ९ आणि ११ ऑक्टोबर रोजी होणार आहेत.

हेही वाचा: ICC T20 Ranking : रिझवानच्या तख्तावर सूर्यकुमारने पकड केली मजबूत

  • भारत यातून निवडणार संघ : शिखर धवन (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी, इशान किशन, संजू सॅमसन, शहाबाझ अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवी बिश्रोई, मुकेश कुमार, आवेश खान, मोहम्मद सिराज, दीपक चहर,

  • आफ्रिका : तेम्बा बाऊमा (कर्णधार), क्विन्टॉन डिकॉक, रेझा हेंद्रिक्स, हेर्निच क्लासेन, केशव महाराज, जानेमाम मलान, एडन मार्करम, डेव्हिड मिलर, लुंगी एन्डिगी, एर्निच नॉर्किया, वेन पार्नेल, फुलुकवायो, ड्वेन प्रीटोरिस, कागिसो रबाडा, ताबेझ शम्सी.