India vs South Africa 1st T20 Preview
esakal
टी-२० विश्वकरंडक मोहिमेची तयारी अंतिम टप्प्यात आणण्यासाठी आजपासून सुरू होणारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धची पाच सामन्यांची मालिका महत्वाची ठरणार आहे. अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि उपकर्णधार शुभमन गिल यांचे पुनरागमन होत असल्याने भारतीय संघ पूर्ण ताकदीनिशी या मालिकेत उतरणार आहे. टी-२० विश्वकरंडरक स्पर्धा फेब्रुवारीत सुरू होत आहे. त्यापूर्वी भारतीय संघ दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडविरुद्ध मिळून १० टी-२० सामने खेळणार आहे. त्यामुळे यातील प्रत्येक सामना पूर्व परीक्षेसारखा असून त्यातून संघरचनाही तयार होणार आहे.