India vs South Africa 2nd Test 2025 Preview
esakal
मायदेशात कसोटी साम्राज्याची वीट न्यूझीलंडने खिळखिळी केली होती. आता याच वर्चस्वाला आणखी एक धक्का बसण्याच्या उंबरठ्यावर भारतीय संघ आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आजपासून सुरू होणारा दुसरा कसोटी सामना जिंकला तरच भारताला मालिका किमान बरोबरीत सोडवता येणार आहे. गेल्या वर्षी न्यूझीलंडने भारताला ३-० असे पराभूत करून व्हाइटवॉश दिला होता.