IND vs SA 3rd ODI : श्रेयस अय्यरचा षटकार अन् भारताने मालिका घातली खिशात

India vs South Africa 3rd ODI Live
India vs South Africa 3rd ODI Liveesakal

India vs South Africa 3rd ODI : भारताने दक्षिण आफ्रिकेचे 100 धावांचे आव्हान 3 फलंदाजांच्या मोबदल्यात 19 व्या षटकात पार करत मालिका 2 - 1 अशी खिशात टाकली. भारताकडून शुभमन गिलने 49 तर श्रेयस अय्यरने नाबाद 28 धावा केल्या. गोलंदाजीत भारताकडून कुलदीप यादवने भेदक मारा करत 4 षटकात 4 विकेट्स घेतल्या. त्याला मोहम्मद सिराज, शाहबाज अहमद आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेत चांगली साथ दिली. दक्षिण आफ्रिकेकडून क्लासेनने सर्वाधिक 34 धावा केल्या.

अय्यर -गिलची भागीदारी, भारताने मालिका टाकली खिशात

श्रेयस अय्यर आणि शुभमन गिलने तिसऱ्या विकेटसाठी 39 धावांची भागीदारी रचली. श्रेयस अय्यरने नाबाद 28 तर शुभमन गिलने 49 धावा करून विजयात मोठा वाटा उचलला.

58-2 : भारताला दुसरा धक्का

फॉर्ट्युनने भारताच्या इशान किशनला 10 धावांवर बाद करत दुसरा धक्का दिला.

42-1 : भारताला पहिला धक्का

दक्षिण आफ्रिकेने ठेवलेल्या 100 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय सलामीवीर शिखर धवन आणि शुभमन गिलने चांगली सुरूवात केली. मात्र शिखर धवन 14 चेंडूत 8 धावा करून धावबाद झाला.

कुलदीप यादवने 5 षटकात घेतल्या 4 विकेट्स 

भारताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने 5 षकात 4 विकेट्स घेत दक्षिण आफ्रिकेचा डाव 99 धावांवर संपवण्यात मोठा वाटा उचलला.

66-5 : अखेर डेव्हिड मिलर बाद झाला

अखेर भारतीय संघाला डेव्हिड मिलरला बाद करण्यात यश आले आहे. वॉशिंग्टन सुंदरने त्याला 7 धावांवर त्रिफला उडवत भारताला मोठे यश मिळवून दिले. या मालिकेत मिलरला बाद करण्यात भारतीय गोलंदाजांना अपयश येत होते.

43-4 : शाहबाज अहमदने आफ्रिकेला दिला मोठा धक्का

डावखुरा फिरकीपटू शाहबाज अहमदने दक्षिण आफ्रिकेला 16 व्या षटकात मोठा धक्का दिला. त्याने एडेन माक्ररमला 9 धावांवर बाद करत आफ्रिकेला चौथा धक्का दिला.

26-3 : सिराजचा आफ्रिकेला दुसरा धक्का 

मोहम्मद सिराजने पुन्हा एकदा शॉर्ट बॉलचा हुशारीने वापर करत रीझा हेंड्रिक्सला 3 धावांवर बाद करत आफ्रिकेला तिसरा धक्का दिला. सिराजची ही दुसरी विकेट आहे. भारताने नाणेफेक जिंकून पहिल्या पॉवर प्लेमध्ये 10 षटकात आफ्रिकेची अवस्था 3 बाद 26 अशी केली.

25-2 : मोहम्मद सिराजने धोकादायक मलानची घेतली विकेट

डिकॉक बाद झाल्यानंतर जानेमाम मलान चांगल्या लयीत दिसत होती. मात्र मोहम्मद सिराजने त्याला शॉर्ट बॉलवर आवेश खान करवी 15 धावांवर झेलबाद करत भारताला दुसरे यश मिळवून दिले.

7-1 : सुंदरने केली डिकॉकची शिकार

वॉशिंग्टन सुंदरने दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज सलामीवीर क्विंटन डिकॉकची 6 धावांवर असताना शिकार केली.

नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने 

अखेर तिसऱ्या वनडे सामन्याचा टॉस झाला असून भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने दुसऱ्या सामन्यातील संघात कोणताही बदल केलेला नाही. तर दक्षिण आफ्रिकेने आजच्या सामन्यात पुन्हा आपला कर्णधार बदलला. नाणेफेक करण्यासाठी डेव्हिड मिलर आला होता. गेल्या सामन्यातील कर्णधार केशव महाराज आजारी पडला असून आफ्रिकेने आपल्या संघात तीन बदल केले आहेत.

सामन्यावर पावसाची अवकृपा 

मालिकेतील पहिल्या वनडे सामन्याप्रमाणे याही सामन्यावर वरूणराजाची वक्रदृष्टी पडली असून मैदान ओलं असल्यामुळे नाणेफेकीस उशीर होत आहे. पंच मैदानाचे पुढचे परिक्षण दुपारी 1.30 वाजता करणार आहेत. त्यानंतर मैदान सामना खेळण्यायोग्य झाले आहे की नाही याचा निर्णय घेण्यात येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com