IND vs SA 3rd T20 : टीम इंडिया आफ्रिकेला व्हाईट वॉश देण्यासाठी सज्ज; जाणून घ्या कुठे पाहायचा सामना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs SA 3rd T20

IND vs SA 3rd T20 : टीम इंडिया आफ्रिकेला व्हाईट वॉश देण्यासाठी सज्ज; जाणून घ्या कुठे पाहायचा सामना

India vs South Africa 3rd t20 : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज इंदूरमध्ये खेळवला जाणार आहे. होळकर क्रिकेट स्टेडियमवर होणारा हा सामना जिंकून आफ्रिकेला व्हाईट वॉश देण्यासाठी टीम इंडिया सज्ज असेल. भारतीय संघाने सध्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया विजयाची हॅट्ट्रिक करण्यासाठी होळकर स्टेडियमवर उतरणार आहे.

हेही वाचा: दोनदा फ्लाइट मिस करणे 'या' खेळाडूला पडले महागात; T20 World Cup संघातून पत्ता कट

टीम इंडियाचा होळकर स्टेडियममधील रेकॉर्ड पाहिला तर आतापर्यंत येथे दोन टी-20 सामने खेळले आहेत. त्याने 22 डिसेंबर 2017 रोजी श्रीलंकेविरुद्ध 88 धावांनी मोठा विजय मिळवला होता. त्यानंतर 7 जानेवारी 2020 रोजी येथेच श्रीलंकेविरुद्धचा सामना सात विकेटने जिंकला. या मैदानावर भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ प्रथमच आमनेसामने येणार आहेत.

हेही वाचा: IND vs SA : अखेरच्या सामन्यात राहुल-विराटला विश्रांती, टीम इंडिया आफ्रिकेला करणार क्लीन स्वीप?

 • भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना कधी सुरू होईल?

  भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता आहे. नाणेफेक संध्याकाळी 6.30 वाजता होईल.

 • सामना कोणत्या टीव्ही चॅनेलवर प्रसारित केला जाईल?

  आशिया कपच्या प्रसारणाचे अधिकार स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत. तुम्ही हा सामना स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 3, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट एचडी वर पाहू शकता.

 • भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना 'फ्री' कुठे पाहायचा

  हा सामना डीडी स्पोर्ट्स चॅनलवर डीडी फ्री डिशवर प्रसारित केला जात आहे. डीडी स्पोर्ट्स चॅनलसाठी कोणतेही शुल्क नाही. अशा परिस्थितीत तुम्ही कोणतेही पैसे न भरता हा सामना पाहू शकता.

हेही वाचा: IND vs SA: टीम इंडियाच्या विजयानंतरही कॅप्टन रोहित 'या' खेळांडूंवर संतापला!

 • भारतीय संघ :

  रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, उमेश यादव, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह (दुखातग्रस्त), शाहबाज अहमद.

 • दक्षिण आफ्रिकेचा संघ :

  टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्टजे, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस, रिसोबा, रिसोबा रुसो, तबरीझ शम्सी, ट्रिस्टन स्टब्स.