
पावसानंतर सामना पुन्हा सुरू झाला, ईशान किशनने पहिल्याच षटकात सलग 2 षटकार
ईशान किशनने केशव महाराजांच्या डावाच्या सुरुवातीच्या षटकात लागोपाठ दोन षटकार मारले. त्याने दुसरा आणि तिसरा चेंडू डीप मिड-विकेटच्या दिशेने षटकारासाठी पाठवला. या षटकात एकूण 16 धावा काढल्या.
IND vs SA T20I: शेवटचा सामना पावसामुळे रद्द; मालिका 2-2 अशी बरोबरी
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचवा आणि अंतिम T20 आंतरराष्ट्रीय सामना एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू खेळला गेला. हा शेवटचा सामना पावसामुळे रद्द केला आहे. सामना रद्द झाल्यानंतर टी-20 मालिका 2-2 अशी बरोबरीत राहिली आणि दोन्ही संघांनी मालिका शेअर केली.
सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टॉसनंतर पाऊस सुरू झाला, त्यामुळे सुमारे 20 मिनिटे वेळ वाया गेला. मात्र, सायंकाळी 7.50 वाजता खेळ सुरू झाला. पावसामुळे सामना 19-19 षटकांचा करण्यात आला आहे. 27 धावांवर भारताने आपले दोन विकेट गमावल्या. सामन्यात पुन्हा पाऊस सुरू झाला असून त्यामुळे खेळ पुन्हा थांबवण्यात आला आहे. ईशान किशन 15 धावांवर आणि ऋतुराज गायकवाड 10 आउट झाले.
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमा या निर्णायक सामन्यातून बाहेर पडला. त्याला गेल्या सामन्यात दुखापत झाली होती. बावुमाच्या जागी केशव महाराज पाचव्या आणि अंतिम T20I सामन्यात आफ्रिकन संघाचे नेतृत्व करत आहेत. कर्णधार ऋषभ पंतने सलग पाचव्यांदा नाणेफेक गमावली आहे. टीम इंडियाने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. दक्षिण आफ्रिकेने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन बदल केले आहेत.
पावसामुळे सामना पुन्हा थांबला, भारत 28/2
सामन्यात पुन्हा पाऊस सुरू झाला असून त्यामुळे खेळ पुन्हा थांबवण्यात आला आहे. खेळ थांबला तोपर्यंत भारताने 3.3 षटकात 2 बाद 28 धावा केल्या होत्या. कर्णधार ऋषभ पंत एका धावेवर नाबाद आहे तर श्रेयस अय्यरने अद्याप खाते उघडलेले नाही.
लुंगी एनगिडीने भारताला दिला दुसरा धक्का
ऋतुराज गायकवाड 10 धावा पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत.
आक्रमक सुरुवातनंतर भारताला पहिला धक्का
ईशानने पहिल्याच षटकात दोन षटकार मारून भारताला आक्रमक सुरुवात करून दिली. मात्र, लुंगी एनगिडीच्या दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर तो बोल्ड झाला. दोन षटकांत भारताची धावसंख्या एका विकेटवर २० धावा. ऋतुराज गायकवाड आणि श्रेयस अय्यर क्रीजवर आहेत.
पावसामुळे सामना 19-19 षटकांचा, 7.50 ला होणार सुरू
सामना पुन्हा एकदा भारताच्या वेळेनुसार संध्याकाळी 7.50 वाजता सुरू होईल. पावसामुळे ओव्हर कट झाला आहे. आता 19-19 षटकांचा सामना खेळवला जाईल.
बंगळुरूमध्ये पाऊस थांबला, लवकर सुरू होणार सामना
बंगळुरूमध्ये पाऊस थांबला आहे. आऊटफिल्ड तसेच खेळपट्टीवरील कव्हर्स काढण्यात आली आहेत.
नाणेफेक झाल्यानंतर बंगळुरूमध्ये मुसळधार पाऊस सुरू
नाणेफेकीनंतर पाऊस सुरू झाला. यामुळे खेळपट्टीवर कव्हर लावण्यात आले आहे. पावसामुळे खेळ अजून सुरू झालेला नाही.
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा मालिकेच्या निर्णायक सामन्यातून बाहेर
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमा या निर्णायक सामन्यातून बाहेर पडला आहे. गेल्या सामन्यात त्याला दुखापत झाली होती. बावुमाच्या जागी केशव महाराज पाचव्या आणि शेवटच्या टी-20 सामन्यात आफ्रिकन संघाचे नेतृत्व करत आहेत.
दक्षिण अफ्रीका : क्विंटन डि कॉक, रीजा हेंड्रिक्स, रासी वैन डेर डुसेन, डेविड मिलर, हेनरिक क्लासेन, ट्रिस्टन स्टब्स, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, केशव महाराज (कप्तान), लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्किया
भारत : ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, युजवेंद्र चहल और आवेश खान
Web Title: India Vs South Africa 5th T20i Match Live Updates Chinnaswamy Stadium Bengaluru Dinesh Karthik Ind Vs Sa
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..