IND VS SA : दक्षिण आफ्रिकेला हरवून टीम इंडियाने रचला इतिहास, जाणून घ्या विजयाची कारणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

india vs south africa in 2nd t20

IND VS SA : दक्षिण आफ्रिकेला हरवून टीम इंडियाने रचला इतिहास, जाणून घ्या विजयाची कारणे

India vs South Africa 2nd T20I : भारताने दुसऱ्या टी-20 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा 16 धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या T20I मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. यासह भारतीय संघाने घरच्या मैदानावर प्रथमच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका जिंकली आहे. तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 सामन्यातही भारताने दक्षिण आफ्रिकेचा 8 गडी राखून पराभव केला. गुवाहाटी येथील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 20 षटकांत 3 गडी गमावून 237 धावा केल्या आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 20 षटकांत 3 गडी गमावून 221 धावांवर रोखले.

हेही वाचा: IND vs SA T20 :भारताचा द. आफ्रिकेवर पहिला टी 20 मालिका विजय मात्र मिलर-डिकॉकने गोलंदाजांना रडवले

दुसऱ्या टी-20 सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजयाची कारणे

सलामीवीर रोहित आणि राहुल

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने आक्रमक सुरुवात केली. रोहित आणि राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी 59 चेंडूत 96 धावांची भागीदारी केली. रोहित 37 चेंडूत 43 धावा करून बाद झाला. त्याचवेळी केएल राहुलने 28 चेंडूत 57 धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 4 षटकार मारले.

विराट कोहली आणि सूर्यकुमार यांच्यात शतकी भागीदारी

रोहित आणि राहुल बाद झाल्यानंतर सूर्यकुमारने कोहलीसोबत बॅटिंगचा तडाका सुरू केला. त्याने 18 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. सूर्या 22 चेंडूत 61 धावा करून धावबाद झाला. त्याने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 5 षटकार मारले. विराट कोहली 28 चेंडूत 49 धावा करून नाबाद राहिला. कोहली आणि सूर्यकुमार यांनी तिसऱ्या विकेटसाठी 42 चेंडूत 102 धावांची शतकी भागीदारी केली.

शेवट षटक दिनेश कार्तिक

दिनेश कार्तिकने पुन्हा एकदा शेवटच्या 7 चेंडूत 17 धावा केल्या. कार्तिक आणि कोहलीने चौथ्या विकेटसाठी 11 चेंडूत 28 धावांची भागीदारी केली. कार्तिकच्या स्फोटक खेळीसाठी विराट कोहलीने 49 धावांवर खेळत असताना स्ट्राईक घेतला नाही. भारतीय संघाने 3 गड्यांच्या मोबदल्यात 237 धावांची मजल मारली.

भारताची दमदार सुरुवात

भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला सुरुवातीलाच दोन मोठे धक्के दिले. यामध्ये कर्णधार टेंबा बावुमा आणि रिले रुऊ खाते न उघडताच बाद झाले. अर्शदीप सिंगने दोघांनाही आपले बळी बनवले. अर्शदीपने दोन आणि अक्षर पटेलने एक गडी बाद केला.