Ind vs SA : लाइव्ह मॅचदरम्यान मैदानात घुसला कुत्रा, झाला मोठा राडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

india vs south africa shreyas iyer ran away dog came in field during delhi cricket

Ind vs SA : लाइव्ह मॅचदरम्यान मैदानात घुसला कुत्रा, झाला मोठा राडा

India vs South Africa : एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा सात गडी राखून पराभव केला. यासह टीम इंडियाने ही मालिका 2-2 ने जिंकली. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर 100 धावांचे लक्ष्य ठेवले होते. टीम इंडियाने 19.1 षटकात तीन विकेट गमावून हे लक्ष्य गाठले. भारताकडून शुभमन गिलने सर्वाधिक 49 धावा केल्या. त्याचवेळी कुलदीप यादवने गोलंदाजीत चार विकेट घेतल्या.

या सामन्यादरम्यान एक कुत्रा मैदानात घुसला. भारतीय संघ यावेळी क्षेत्ररक्षण करत होता. त्याला लवकरच मैदानातून बाहेर काढण्यात आले असले तरी, बीसीसीआयवर जोरदार टीका होत आहे.

हेही वाचा: T20 World Cup: भारतासाठी आनंदाची बातमी, शमी फिट; लवकरच होणार ऑस्ट्रेलियाला रवाना

दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान असे काही घडले की जे सहसा आंतरराष्ट्रीय सामन्यात होणे अपेक्षित नसते. कडेकोट बंदोबस्त असतानाही एखादा प्राणी मैदानात जातो तर ती सुरक्षा कर्मचाऱ्यांची चूक मानली जाईल. कोटला येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यादरम्यान एक कुत्रा मैदानात घुसला. ग्राऊंड स्टाफने ते मैदानाबाहेर काढले पण बाहेर जाण्यापूर्वीच त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली.

हेही वाचा: T20 WC Flash Back : युवराजच्या 6 सिक्समुळं DK ला टॉयलेटलाही जाता आलं नाही

कुलदीप यादवने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 4.1 षटकांत 18 धावांत 4 बळी घेतल्या. पाहुण्या संघाविरुद्ध शुभमन गिलने 49 आणि श्रेयस अय्यरने 28 धावा केल्या, जे अवघ्या 99 धावांवर गारद झाले. दक्षिण आफ्रिकेने पहिला सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती, मात्र सलग दोन सामने जिंकून टीम इंडियाने ट्रॉफीवर कब्जा केला.