T20 World Cup: भारतासाठी आनंदाची बातमी, शमी फिट; लवकरच होणार ऑस्ट्रेलियाला रवाना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mohammed Shami

T20 World Cup: भारतासाठी आनंदाची बातमी, शमी फिट; लवकरच होणार ऑस्ट्रेलियाला रवाना

Mohammed Shami T20 World Cup : भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने फिटनेस चाचणी उत्तीर्ण केली आहे. मोहम्मद शमीची तंदुरुस्ती चाचणी मंगळवारी बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत झाली. शमीने ही फिटनेस टेस्ट पास केली आहे. आता आगामी T20 विश्वचषक 2022 मध्ये जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद शमी प्रबळ दावेदार असणार आहे आणि तो लवकरच ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे.

हेही वाचा: T20 WC Flash Back : युवराजच्या 6 सिक्समुळं DK ला टॉयलेटलाही जाता आलं नाही

बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत फिटनेस चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतर मोहम्मद शमी आता ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. येत्या काही दिवसांत मोहम्मद शमीसह श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई आणि मोहम्मद सिराज ऑस्ट्रेलियाला रवाना होतील, असे मानले जात आहे. मात्र, दीपक चहरला टी-20 विश्वचषक संघात स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे. 15 ऑक्टोबरपर्यंत तो तंदुरुस्त होण्याची शक्यता कमी आहे. विशेष म्हणजे भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे आगामी टी-२० विश्वचषकातून बाहेर पडला आहे. अशा परिस्थितीत मोहम्मद शमीची फिटनेस चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतर जसप्रीत बुमराहच्या जागी तो प्रबळ दावेदार असल्याचे मानले जात आहे.

हेही वाचा: VIDEO : बोलो तारा रा रा! मालिका विजयानंतर कर्णधार शिखरसह पोरं तुफान नाचली

कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ऑस्ट्रेलियात पोहोचला आहे. त्याच वेळी 16 ऑक्टोबरपासून T20 विश्वचषक 2022 सुरू होत आहे. मात्र भारतीय संघ या स्पर्धेतील आपल्या मोहिमेची सुरुवात 23 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने करणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 17 ऑक्टोबरला पहिला सराव सामना खेळणार आहे. 19 ऑगस्ट रोजी दुसरा सराव सामना खेळणार आहे. सोमवारी या दौऱ्यातील पहिल्या सराव सामन्यात भारतीय संघाने वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचा 13 धावांनी पराभव केला.