

shubman gill with gautam gambhir
esakal
भारताला घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेकडून कसोटी मालिकेत ०-२ असा क्लीन स्वीप स्वीकारावा लागला. तब्बल २५ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने भारतीय भूमीवर कसोटी मालिका जिंकली, तेही अत्यंत अपमानास्पद पद्धतीने. कोलकात्यात पहिल्या कसोटीत ३० धावांनी तर गुवाहाटीत दुसऱ्या कसोटीत थेट ४०८ धावांनी भारताचा दारुण पराभव झाला. २००० नंतर दुसऱ्यांदा दक्षिण आफ्रिकेने भारताला अशा प्रकारे व्हाईटवॉश केले.