suryakumar yadav
suryakumar yadav sakal

IND vs SL: मैदानावर घडलं असं काही... प्रमोशनच्या पहिल्याच दिवशी सूर्या झाला कर्णधार

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरला पण...

India vs Sri Lanka : भारत आणि श्रीलंका यांच्यात वानखेडेवर तीन टी-20 मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. जो भारताने 2 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरला होता. त्याचबरोबर या मालिकेसाठी सूर्यकुमार यादवला उपकर्णधार बनवण्यात आले आहे. 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या सूर्याला प्रथमच भारतीय संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आणि तो प्रथमच मैदानावर कर्णधाराची भूमिका बजावताना दिसला.

 suryakumar yadav
IND vs BAN: उमरानच्या एकाच चेंडूत लंकेचा कर्णधार बाद झाला... सामना हातात आला अन् बुमराह देखील मागं पडला

खरं तर, सामन्यादरम्यान पांड्याला दुखापत झाली होती. त्यामुळे पांड्याला मैदानाबाहेर जावं लागलं आणि त्याच्या अनुपस्थितीत सूर्या कर्णधार झाला. जवळपास 11व्या षटकात भानुका राजपक्षेचा झेल घेताना पांड्या जखमी झाला होता. राजपक्षेचा झेल घेत त्याने श्रीलंकेला पाचवा धक्का दिला, पण यादरम्यान त्याने स्वतःला अडचणीत टाकले.

 suryakumar yadav
IND vs SL: 19व्या षटकात टीम इंडियाने पुन्हा खाल्ली माती! शेवटी अक्षरने फिरवली जादूची कांडी

कॅच पकडताना पांड्याच्या उजव्या पायात ताण आला होता. यादरम्यान तो वेदनेतही दिसला आणि त्याला काही काळ मैदानाबाहेर नेण्यात आले. परतल्यानंतर त्याने आपल्या अप्रतिम रणनीतीने भारताला रोमहर्षक विजय मिळवून दिला. विजयानंतर पांड्याने दुखापतीबाबत माहिती दिली. सर्व काही ठीक आहे, जर मी हसत असेल तर याचा अर्थ सर्वकाही ठीक आहे.

 suryakumar yadav
IND vs SL: शेवटचे षटक टाकण्यासाठी अक्षरलाच का निवडले? हार्दिक म्हणाला, मला धोका...

हार्दिक पांड्याने गोलंदाजांचे कौतुक केले आणि सांगितले की, आम्ही सामना गमावला असता, परंतु युवा खेळाडूंनी जबरदस्त पुनरागमन केले. मी शिवम मावीला आयपीएलमध्ये चमकदार गोलंदाजी करताना पाहिले होते आणि मी त्याला फक्त सरळ गोलंदाजी करण्यास सांगितले होते. मी त्याला सांगितले की त्याच्या चेंडूलाही चौकार लागल्याने काही फरक पडत नाही. मावीने पदार्पण करताना 22 धावांत 4 बळी घेतले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com