
India vs Sri Lanka 1st T20I : भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला टी-20 सामना लखनऊच्या मैदानात रंगला होता. श्रीलंकेच्या कर्णधाराने पहिल्या टी-20 सामन्यात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफक गमावलेल्या टीम इंडियाने पहिल्यांदा बॅटिंग करताना दमदार सुरुवात केली. सलामीवीर रोहित शर्मा आणि ईशान किशन जोडीनं पहिल्या विकेटसाठी 111 धावांची भागीदारी केली. कर्णधार रोहित शर्मा 32 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकारासह 44 धावा, ईशान किशन 89 धावा आणि श्रेयस अय्यरनं केलेल्या नाबाद 57 धावांच्या खेळीच्या जोरावर टीम इंडियाने निर्धारित 20 षटकात 2 बाद 199 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ 137 धावापर्यंत मजल मारू शकला. श्रीलंकेकडून असलंकाने 47 चेंडूत नाबाद 53 धावा केल्या.
श्रीलकेनं गमावली सहावी विकेट
चमीका करुणारत्ने 21 धावा करुन परतला. व्यंकटेश अय्यरला दुसरे यश
लंकेचा अर्धा संघ तंबूत
कर्णधार दनुश शनाकाही स्वस्तात माघारी, चहलने घेतली फिरकी, त्याने अवघ्या तीन धावांची भर घातली
कमबॅक मॅन ऑनमोड, श्रीलंकेचा चौथा गडी तंबूत
दिनेश चांडिमलही 10 धावा करुन माघारी, कमबॅक करणाऱ्या रविंद्र जाडेजाला मिळाली विकेट
श्रीलंकेला तिसरा धक्का
व्यंकटेश अय्यरचे पहिले यश; लियांगने 17 चेंडूचा सामना करून 11 धावांची घातली भर
तिसऱ्या षटकात श्रीलंकेनं गमावली दुसरी विकेट
वैयक्तीक दुसऱ्या षटकात भुवीला मिळाली दुसरी विकेट, त्याने कमिल मिश्राला 13 धावांवर धाडले तंबूत
भुवीला पहिल्याच चेंडूवर मिळाले यश
निसांकाला पहिल्याच चेंडूवर तंबूचा रस्ता दाखवत भुवनेश्वर कुमारनं संघाला पहिले यश मिळवून दिले
भारतीय संघाने निर्धारित 20 षटकात कुटल्या 2 बाद 199 धावा; श्रीलंकेसमोर 200 धावांचं लक्ष
श्रेयस अय्यरचंही अर्धशतक
श्रेयस अय्यरच टी-20 कारकिर्दीतील चौथे अर्धशतक
ईशान किशनची मोठी संधी हुकली, शनाकानं दाखवला तंबूचा रस्ता
सलामीवीर ईशान किशन याने जबरदस्त खेळी केली. त्याला टी-20 कारकिर्दीतील पहिल्या शतकाची संधी होती. पण तो 89 धावांवर बाद झाला
भारतीय संघाला पहिला धक्का
भारतीय संघाच्या धावफलकावर 111 धावा असताना रोहित शर्माच्या रुपात संघाला पहिला धक्का बसला, त्याने 44 धावांचे योगदान दिले
इशान किशन-रोहित जोडी जमली
इशान किशन अर्धशतक रोहितही त्याच दिशने करतोय बॅटिंग, दोघांनी संघाला दमदार सुरुवात करुन दिलीये.
रोहित शर्मानं इशानच्या साथीनं केली डावाला सुरुवात
कर्णधार रोहित शर्माने वेस्ट इंडीज विरुद्धच्या सामन्यात आयपीएल फॉर्म्युला अवलंबल्याचे पाहायला मिळाले. स्वत: चौथ्या क्रमाकावर फलंदाजीला येत त्याने ऋतूराज आणि इशानकरवी डावाला सुरुवात करण्याचा प्रयोग केला होता. पण श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात तो इशानसोबत पुन्हा डावाची सुरुवात करताना दिसले.
असा आहे श्रीलंकेचा संघ :Sri Lanka (Playing XI):
पथुन निसांका, कमिल मिश्रा, सी अससंका, दिनेश चंडीमल, जनिथ लायंगे, दसुन शनाका, चमिका करुणारत्ने, जेफ्री वेंडरसे, प्रविण जयविक्रमा, दुशमंथा चमिरा, लाहिरु कुमारा.
असा आहे भारतीय संघ
रोहित शर्मा, इशान किशन, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, रविंद्र जाडेजा, व्यंकटेश अय्यर, दीपक हुड्डा. हर्षल पटेल. जसप्रित बुमराह, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.