India vs Sri Lanka 1st Test Live : IND vs SL : पहिल्या दिवसाअखेर भारत 6 बाद 357 धावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

India vs Sri Lanka, Day 1 Stumps

IND vs SL : पहिल्या दिवसाअखेर भारत 6 बाद 357 धावा

मोहाली: भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील पहिला कसोटी सामना मोहालीच्या मैदानात खेळवण्यात येत आहे. या कसोटीला (Test Cricket) एक ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे. भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीची शंभरावी कसोटी (Virat Kohli 100th Test) आहे. तर रोहित शर्मा (Rohit Sharma) कसोटी संघाचा पूर्णवेळ कर्णधार झाल्यानंतरची ही त्याची पहिलीच कसोटी आहे. या सामन्यात विराट कोहली मोठी खेळी करेल, अशी अपेक्षा होती. पण त्याला फिफ्टीही करता आली नाही.

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मानं मयांक अग्रवालच्या साथीनं डावाला सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारीही पूर्ण केली. पण 29 धावांवर रोहित शर्मा बाद झाला. त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलेल्या हनुमा विहारीनं संधीच सोनं करत अर्धशतक झळकावले. सलामीवीर मयांक अग्रवाल 33 धावा करुन परतल्यानंतर विराट कोहली मैदानात आला.

त्याने चांगली सुरुवातही केली. पण 45 धावांवर तो बोल्ड झाला. विराटच्या शतकी सामन्यात पंत सेंच्युरी करेल, असे वाटत होते. पण त्याचे शतकही अवघ्या 4 धावांनी हुकले. श्रेयस अय्यर 27 धावा केल्या. पहिल्या दिवसाअखेर भारतीय संघाने 6 गड्यांच्या मोबदल्यात 357 धावा केल्या होत्या. रविंद्र जाडेजा 45 आणि आर अश्विन 10 धावांवर नाबाद खेळत होते. श्रीलंकेकडून लसिथ एम्बुल्डेनियाने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या. लकमल, डिसिल्वा, लाहीरु कुमारा आणि विश्वा फर्नांडो यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.

332-6 : पंतचं शतक हुकलं; लकमलनं 96 धावांवर केलं बोल्ड

228-5 : श्रेयस अय्यरच्या रुपात टीम इंडियाला पाचवा धक्का, त्याने 48 चेंडूत 27 धावा केल्या

विश्रांतीनंतर पंत फार्मात; भारतीय संघाच्या पहिल्या डावात अर्धशतक पूर्ण

175-4 : विराटनंतर विहारी देखील बाद; भारताला चौथा धक्का

विराट कोहलीचे शंभराव्या कसोटीत शतक ठोकण्याचे स्वप्न भंगले; 45 धावा करून बाद

हनुमा विहारीचे अर्धशतक; भारत दीडशतकाच्या समीप

109-2 : भारताची शंभरी पार; विराट - हनुमा विहारी दुहेरी आकड्यात

80-2 : भारताचे दोन्ही सलामीवीर पॅव्हेलियनमध्ये; रोहित पाठोपाठ मयांक अग्रवाल देखील 33 धावा करून झाला बाद

भारताला पहिला धक्का; कर्णधार रोहित 29 धावा करून परतला माघारी

अजिंक्य राहणे - चेतेश्वर पुजाराची जागा हनुमा विहारी आणि श्रेयस अय्यर घेणार

भारताचा फलंदाजीचा निर्णय, भारत दोनच वेगवान गोलंदाज घेऊन उतरणार

Web Title: India Vs Sri Lanka 1st Test Live Score Update Virat Kohli 100th Test Rohit Sharma Start Test Captaincy

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top