IND vs SL: मालिका विजयाची मोहीम टीम इंडिया पुण्यात करणार फत्ते?

श्रीलंकेविरुद्ध आज दुसरा सामना; गोलंदाजीत अजून सुधारणा आवश्यक
India vs Sri Lanka 2nd T20I Match details i
India vs Sri Lanka 2nd T20I Match details i sakal

Ind Vs SL 2nd T20 : मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या अटीतटीच्या सामन्यातील विजय आनंद देणारा असला तरी भारतीय संघ त्यात जास्त समाधान मानणार नाही. पुण्यात आज होणारा दुसरा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर केल्याशिवाय हार्दिक पंड्याचा भारतीय संघ शांत बसणार नाही.

India vs Sri Lanka 2nd T20I Match details i
IND vs SL 2nd T20 Playing 11 : संजू सॅमसनच्या ऐवजी राहुल त्रिपाठीला मिळणार संधी; 'हे' कारण आलं समोर

अपेक्षेप्रमाणे पाहुण्या संघाने जोरदार खेळ करून भारतीय संघाला विजयासाठी चांगलेच झगडायला लावले. टी-२० क्रिकेटमध्ये चांगला खेळ करायची क्षमता श्रीलंकन संघात नक्कीच आहे हे उघड दिसून आले. गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना प्रश्न विचारून अडचणीत आणले होते. दीपक हुडा आणि अक्षर पटेलने योग्यवेळी निर्णायक भागीदारी करून धावसंख्येला दिलेला आकार अखेर कामाला आला.

दुसऱ्या सामन्यात वरच्या क्रमांकावर फलंदाजी करायला मिळणाऱ्या फलंदाजांना भक्कम खेळ करून दाखवावा लागेल. विशेष करून ईशान किशन आणि शुभमन गिल यांना अर्धवट खेळी करून चालणार नाही. संजू सॅमसन दुखापतीमुळे मालिकेतील उर्वरीत लढतींत खेळू शकणार नाही.

India vs Sri Lanka 2nd T20I Match details i
Rishabh Pant : ऋषभ पंतबाबत दिल्ली कॅपिटल्स मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; बीसीसीआय सोबत...

धावांचा पाऊस पडावा म्हणून पुण्यातील खेळपट्टी टणक करायचा प्रयत्न केला गेला आहे. दोन्ही संघांतील फलंदाज मोठे फटके मारताना कचरणार नाहीत अशी खेळपट्टी असण्याची शक्यता जास्त वाटते. कशीही खेळपट्टी असली तरी श्रीलंकन गोलंदाज हसरंगा आणि तीक्षणा वेगळ्या प्रकारची लेगस्पीन टाकून भारतीय फलंदाजांना अडचणीत आणायचा प्रयत्न करतील.

‘भारतीय संघातील तरुण खेळाडूंना अडचणीत कसा खेळ करायचा असतो, हे शिकवणारा पहिला सामना होता, ज्याचा मला आनंद आहे. टी-२० खेळ प्रकारात कोणताच संघ कमकुवत नसतो, हेच परत दिसून आले. प्रत्येक सामन्यानंतर काय चुका केल्या, याचा ऊहापोह करून त्यात सुधारणा करून पुढे जायचा आमचा विचार असेल,’ असे भारतीय कर्णधार हार्दिक पंड्या म्हणाला. या वेळी बीसीसीआयचा हार्दिककडे दिर्घ काळासाठी टी-२० संघाची धुरा सोपवण्याचा विचार नक्कीच दिसतो आहे.

घरच्या मैदानावर ऋतुराजला संधी

पुण्यात भारतीय संघ टी-२० सामना खेळत असल्याने प्रेक्षकांच्यात उत्साह आहे. स्थानिक खेळाडू ऋतुराज गायकवाडला ११ जणांच्या संघात संधी मिळेल, असे वाटत नव्हते. पण संजू सॅमसनला दुखापत झाल्यामुळे आता एक जागा रिकामी झाली आहे. त्यामुळे ऋतुराजला उद्याच्या टी-२० लढतीत भारतीय संघात संधी मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com