IND vs SL : 200 कोटींचा फटका! मालिकेच्या पहिल्याच सामन्याने स्टार स्पोर्ट्स, हॉटस्टारचे धाबे दणाणले

India vs Sri Lanka Broadcaster
India vs Sri Lanka Broadcaster ESAKAL

India vs Sri Lanka Broadcaster : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना वानखेडे स्टेडियमवर पार पडला. पहिल्याच सामन्यात भारताने श्रीलंकेवर शेवटच्या चेंडूवर 2 धावांनी निसटता विजय मिळवला. मात्र टीम इंडियाने जरी वर्षाची सुरूवात विजयाने केली असली तरी भारताचा विजय सामन्यांचे अधिकृत प्रसारण करणाऱ्या स्टार स्पोर्ट्स आणि डिस्ने हॉटस्टारसाठी मात्र चिंता वाढवणारी ठरली आहे.

India vs Sri Lanka Broadcaster
Rishabh Pant Update : पंतच्या हेल्थबाबत मोठी अपडेट; उपचारांसाठी मुंबईत हलवणार

भारत आणि श्रीलंका मालिकेचे थेट प्रक्षेपण आणि स्ट्रीमिंगचे अधिकार हे स्टार स्पोर्ट्स आणि डिस्ने हॉटस्टार यांच्याकडे आहेत. मालिकेतील पहिला सामना वानखेडे स्टेडियमवर झाला. हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत उत्कंठावर्धक स्थितीत होता. असे सामने क्रीडा रसिकांसाठी एक पर्वणीच असतात. मात्र सामना उत्कंठा ताणून धरणारा झाला असला तरी याचे प्रसारण करणाऱ्या स्टार स्पोर्ट्स आणि डिस्ने हॉटस्टारसाठी चिंता वाढवणारा ठरला.

पहिल्या सामन्यादरम्यान स्टार स्पोर्ट्सवर दोन ते तीन ब्रँडच्याच जाहीराती दिसत होत्या. तर सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग करणाऱ्या डिस्ने हॉटस्टारची पाट तर कोरीच होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार डिस्ने हॉटस्टारला भारत श्रीलंका मालिकेत जवळपास 200 कोटी रूपयांचा फटका बसू शकतो. (Sports Latest News)

सामन्याचे प्रसारण करणारे ब्रॉडकास्टर हे बीसीसीआयला प्रसारण हक्काच्या स्वरूपात प्रती सामना जवळपास 60.01 कोटी रूपये देत असतात. मात्र सध्या ब्रॉडकास्टर्सना यातील फक्त 30 ते 40 टक्के रक्कमच जाहीरातींच्या माध्यमातून रिकव्हर होत आहे.

India vs Sri Lanka Broadcaster
IND vs SL: एंन्ट्री असावी तर अशी! पदार्पणाच्या सामन्यात रचला इतिहास

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 'नवीन वर्षातील पहिली मालिका ही अपेक्षेपेक्षा फार कमी व्यवसाय करून देत असते. अनेक जाहिरातदार आणि जाहिरात कंपन्या गुंतवणूक करण्यात आखडता हात घेत असतात. मात्र भारत - श्रीलंका मालिकेतील पहिल्याच सामन्यात जे पहायला मिळाले ते अभुतपूर्व आहे. तुम्ही विचार करा हॉटस्टारला पहिल्या टी 20 सामन्यात एकही जाहिरातदार मिळाला नाही. तर लाईव्ह प्रक्षेपणावेळी फक्त 15 ते 20 टक्केच इनव्हेंटरीची विक्री झाली.'

भारत - श्रीलंका मालिकेत फक्त ब्रॉडकास्टर्सना फटका बसला नसून बीसीसीआयचे एका पाठोपाठ एक स्पॉन्सर्स देखील नवीन वर्षात काढता पाय घेत आहेत. टीम इंडियाचे जर्सी स्पॉन्सर MPL यांनी आपले हक्क किलरला हस्तांतरित केले. त्याचबरोबर बायजूने देखील करार संपवण्याची विनंती बीसीसीआयला केली आहे.

हेही वाचा : ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com