IND vs SL: एंन्ट्री असावी तर अशी! पदार्पणाच्या सामन्यात रचला इतिहास

शिवम मावीने पदार्पणाच्या सामन्यातच घातला धुमाकूळ...
ind vs sl shivam mavi registers third best bowling figures for india on t20i debut cricket news kgm00
ind vs sl shivam mavi registers third best bowling figures for india on t20i debut cricket news kgm00

India vs Sri Lanka 1st T20 : वानखेडे स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताने शेवटच्या चेंडूवर 2 धावांनी सामना जिंकला. युवा मध्यमगती गोलंदाज शिवम मावी याने पदार्पणातच 4 षटकात 22 धावा देत 4 बळी घेत इतिहास रचला. त्याने पहिल्या सामन्यात घातक गोलंदाजी करत श्रीलंकेच्या संघाला घाम फोडला.

ind vs sl shivam mavi registers third best bowling figures for india on t20i debut cricket news kgm00
IND vs BAN: मैदानावर घडलं असं काही... प्रमोशनच्या पहिल्याच दिवशी सूर्या झाला कर्णधार

मावी गोलंदाजांच्या एका खास क्लबमध्ये सामील झाला आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या सामन्यात चार विकेट घेणारा तो तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी बरिंदर सरन आणि प्रज्ञान ओझा यांनी ही कामगिरी केली होती.

बरिंदरने 20 जून 2016 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध हरारे येथे ही कामगिरी केली होती. त्याने 10 धावा काढून चार बळी घेतले. प्रज्ञानने 6 जून 2009 रोजी बांगलादेशविरुद्ध 21 धावांत चार बळी घेतले होते. हा सामना नॉटिंगहॅममध्ये खेळला गेला.

ind vs sl shivam mavi registers third best bowling figures for india on t20i debut cricket news kgm00
Rishabh Pant Accident : ऋषभ पंतच्या हेल्थबाबत मोठी अपडेट; उपचारांसाठी महाराष्ट्रात हलवणार

भारताने श्रीलंकेसमोर 163 धावांचे लक्ष्य ठेवले, ज्यामध्ये मावीने बचावात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने प्रत्येक षटकात एक विकेट घेतली. मावीने पहिल्याच षटकात पथुम निसांकाला (1) तर दुसऱ्याच षटकात धनंजय डिसिल्वाला (8) पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

डिसिल्वाने संजू सॅमसनकडे झेल सोपवला. मावीने वनिंदू हसरंगाला (21) हार्दिक पांड्याकडे तिसर्‍याच षटकात झेलबाद केले. त्याने चौथ्या षटकात (1) महिष थेक्षानाला बाद केले, त्याला सूर्यकुमार यादवने झेलबाद केले. या सामन्यात भारताने दोन धावांनी रोमहर्षक विजय नोंदवला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com