esakal | SL vs IND : टीम इंडियावर आलीये नेट बॉलरसह खेळण्याची वेळ
sakal

बोलून बातमी शोधा

Team India

SL vs IND : टीम इंडियावर आलीये नेट बॉलरसह खेळण्याची वेळ

sakal_logo
By
सुशांत जाधव

India vs Sri Lanka T20 : भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर तिसरा आणि अखेरचा सामना रंगणार आहे. निर्णयाक सामना जिंकून भारतीय संघ मालिकेची सांगता विजयाने करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. क्रुणाल पांड्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कातील 9 जणांना क्वांरटाईन करण्यात आल्यामुळे दुसऱ्या टी-20 सामन्यात चौघांना संधी मिळाल्याचे पाहायला मिळाले. निर्णायक टी-20 सामन्यात नेटमध्ये गोलंदाजी करणाऱ्या भारतीय गोलंदाजांना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते. (India vs Sri Lanka T20 Series Ind vs SL 3rd T20 Match India Playing xi Navdeep Saini Not Fully Fit Shikhar Dhawan Bhuvneshwar Kumar)

हेही वाचा: SLvsIND : धनंजया डी सिल्वाचा जलवा; लंकेनं केला विजयाचा 'कालवा'

दुसऱ्या टी-20 सामन्यात नवदीप सैनीला दुखापत झाली होती. त्याच्या जागी कोणाला खेळवायचे हा प्रश्न आता टीम इंडियासमोर उभा राहिलाय. 5 नेट बॉलर्ससोबत भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर गेलाय. यात अर्शदीप सिंह, ईशान पोरेल, संदीप वॉरियर, साइ किशोर आणि सिमरजीत सिंह यांचा समावेश आहे. नवदीप सैनी मेडीकल टीमच्या निरीक्षणाखाली असल्याची माहिती श्रीलंका दौऱ्यावरील टीम इंडियाचे बॉलिंग कोच पारस म्हाम्ब्रे यांनी दिली होती. दुखापतीमुळे नवदीप सैनी अखेरच्या सामन्याला मुकला तर अखेरच्या सामन्यात यातील एकाला संधी मिळू शकेल. अर्शदीप सिंह या शर्यतीत आघाडीवर असेल. अर्शदीप सिंहने आयपीएलच्या 14 व्या हंगामात पंजाब किंग्जकडून खेळताना दमदार कामगिरी केली होती.

हेही वाचा: ऑलिम्पियन प्रवीणचं कौतुक करावं तेवढं कमीच

दुसऱ्या टी-20 सामन्यात चेतन साकारियाला संधी मिळाली होती. पदार्पणाच्या सामन्यात त्याला आपल्या गोलंदाजीतील भेदकता दाखवता आली नाही. सकारियाने 3.4 षटकात 34 धावा खर्च करुन केवळ एक विकेट मिळवली होती. त्याला पुन्हा संघात स्थान मिळणार की आणखी एका नवोदिताचे पदार्पण होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

संभाव्य भारतीय संघ : ऋतुराज गायकवाड, शिखर धवन (कर्णधार), देवदत्त पदिक्कल, संजू सॅमसन, नीतीश राणा, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, राहुल चाहर, अर्शदीप सिंह, चेतन सकारिया, वरुण चक्रवर्ती.

loading image
go to top