esakal | ऑलिम्पियन प्रवीणचं कौतुक करावं तेवढं कमीच; उदयनराजेंची सातारच्या सुपुत्राला शाबासकी
sakal

बोलून बातमी शोधा

Archery Player Pravin Jadhav

खूप अभिमान वाटतो, त्या आई-वडिलांचा ज्यांनी शेतमजुरी करून आपल्या मुलाला शिकवले व नंतर खेळासाठी प्रोत्साहित केले.

ऑलिम्पियन प्रवीणचं कौतुक करावं तेवढं कमीच

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

सातारा : जिल्ह्यातील सरडे (ता. फलटण) गावातील एका मजूर आई-वडिलांच्या पोटी जन्मलेल्या प्रवीण जाधवची (Archery Player Pravin Jadhav) ऑलिम्पिकसाठी (Tokyo Olympic 2021) निवड होते अन् बघता-बघता आपल्या अतुलनीय कामगिरीच्या व कष्टाच्या जोरावर जगातील उत्कृष्ट अंतिम सोळा खेळाडूंमध्ये प्रवेश करून क्रमांक 'एक'वर असलेल्या खेळाडूला टक्कर देतो; पण काही कारणास्तव पराभूत झालेल्या प्रवीणचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे, असे गौरवोद्गार खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांनी काढले. (Tokyo Olympic MP Udayanraje Bhosale Lauded Olympian Pravin Jadhav bam92)

ते पुढे म्हणाले, खूप अभिमान वाटतो, त्या आई-वडिलांचा ज्यांनी शेतमजुरी करून आपल्या मुलाला शिकवले व नंतर खेळासाठी प्रोत्साहित केले. प्रवीणचा धनुर्विद्या खेळातील प्रवास अतिशय खडतर असा आहे. परंतु, त्याची जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर सातारा जिल्ह्याचा व सरडे गावचा डंका आज सातासमुद्रापार ऑलिम्पिकमध्ये वाजवला यात तीळमात्र शंका नाही. सुरुवातीला प्रवीणने बांबूपासून तयार केलेल्या धनुष्य-बाणाने सराव करण्यास सुरुवात केली. कालांतराने प्रवीणने या खेळात गती पकडत सर्व प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकण्यास सुरुवात केली. वर्षभरापूर्वी प्रवीण हा स्पोर्ट्स कोट्याअंतर्गत भारतीय लष्करात दाखल झाला. नोकरी लागल्यानंतरही आपला फॉर्म कायम राखला, तर आगामी टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्याला नक्की संधी मिळेल, असा विश्वास प्रवीणच्या प्रशिक्षकांनी दोन वर्षांपूर्वीच व्यक्त केलेला. जो आज प्रवीणने खरा केला आहे.

हेही वाचा: शेतकऱ्याचा नादच खुळा! पठ्ठ्यानं चक्क बंगल्याला दिलं '86032' उसाचं नाव

प्रवीणचा छोट्या गावातून सुरू झालेला हा अविश्वसनीय, आदर्शवत प्रवास संपूर्ण देशातल्या गावाकडील होतकरू व जिद्दी खेळाडूंच्या प्रेरणेचा अविभाज्य भाग असेल. घरची परिस्थिती अतिशय बिकट असताना त्याने हे यश मिळवले आहे. प्रवीणने आत्तापर्यंत दहावेळा भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. बऱ्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक देखील प्राप्त केलेली आहेत. सातारा जिल्ह्यातील अजून खेळाडू ऑलिम्पिक स्पर्धेपर्यंत पोहोचावेत. मी ऑलिम्पिकपर्यंतचा प्रवास यशस्वीपणे करु शकलो, तसेच अजून खेळाडू देखील तयार व्हावेत, ही त्याची तळमळ अतिशय स्तुत्य आहे. सातारा जिल्ह्यातील होतकरू व जिद्दी खेळाडूंच्या पाठीशी आम्ही नेहमीच राहिलो आहोत आणि या पुढेही राहू, असा विश्वासही खासदार उदयनराजे यांनी व्यक्त केला.

Tokyo Olympic MP Udayanraje Bhosale Lauded Olympian Pravin Jadhav bam92

loading image
go to top