IND vs SL: नव्या संघाकडून नववर्षाची सुरुवात! सामना कधी अन् कुठे पहायचा ते जाणून घ्या... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs SL T20 Live Streaming

IND vs SL: नव्या संघाकडून नववर्षाची सुरुवात! सामना कधी अन् कुठे पहायचा ते जाणून घ्या...

India vs Sri Lanka 1st t20 Live Streaming Telecast : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. भारत आणि श्रीलंका संघ 2023 मध्ये पहिल्यांदा मैदानात उतरणार आहेत. टीम इंडियाचे कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा अनफिट असल्यामुळे या मालिकेत खेळणार नाही. तो एकदिवसीय मालिकेतून पुनरागमन करेल.

हेही वाचा: Team India : चेतन शर्माचं निवड समितीचा खुर्ची सम्राट ?

भारतीय संघातील 'बिग-थ्री' रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल यांना श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत स्थान देण्यात आलेले नाही. अशा स्थितीत संघावर हार्दिकची छाप पूर्णपणे दिसून येईल. यावर्षी भारत एकदिवसीय विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार आहे. बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापनाचे संपूर्ण लक्ष त्या स्पर्धेवर आहे. त्यासाठी व्यवस्थापनाने 1 जानेवारीला बैठक घेऊन रोडमॅपही तयार केला. कोहली, रोहित आणि राहुल यांनाही छोट्या फॉरमॅटपासून दूर ठेवता येईल. अशा परिस्थितीत हार्दिकला संघ तयार करण्याची पूर्ण संधी असेल.

हेही वाचा: IND vs SL: 360 डिग्री सूर्या घरच्या मैदानावर करणार टोलेबाजी! पण सलामीला कोण खेळणार?

जाणून घेऊया मॅचच्या प्रक्षेपण संबंधित सर्व माहिती...

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला T20 कधी, कोठे, किती वाजता खेळला जाणार ?

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला T20 सामना मंगळवार 3 जानेवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.00 वाजता खेळला जाणार आहे. नाणेफेक 6:30 वाजता होणार आहे.

सामना कोणत्या टीव्ही चॅनलवर प्रसारित होईल?

स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे भारत विरुद्ध श्रीलंका टी-20 आणि एकदिवसीय मालिकेचे प्रसारण करण्याचे अधिकार आहेत. हा सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनेलवर हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त देशातील इतर भाषांमध्ये कॉमेंट्रीसह पाहू शकता.