
India vs West Indies 1st ODI : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील वनडे मालिकेला सुरुवात झाली आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) कॅप्टन्सीत भारतीय संघ ऐतिहासिक सामना खेळण्यासाठी क्रिकेटच्या मैदानात उतरला. वेस्ट इंडीज विरुद्ध भारतीय संघ 1000 वा सामना खेळत आहे. आतापर्यंत कोणीही एवढे वनडे सामने खेळलेले नाहीत. या सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा फिल्डिंगसंदर्भात एकमेकांशी चर्चा करताना दिसले. रोहित समोर नेतृत्वाची त्याची झलक खास अशीच होती. (Virat Kohli not captain but he still leader Front OF Rohit Sharma)
टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी विराट कोहलीने टी-20 संघाचे नेतृत्व सोडले. त्याच्या या निर्णयानंतर टी-20 सह वनडे संघाचे नेतृत्व रोहितच्या खांद्यावर देण्यात आले. आफ्रिका दौऱ्यावरील वनडेत विराट कोहली लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. कॅप्टन्सीतून पाय उतार झाल्यानंतर रोहित-विराट पहिल्यांदाच मैदानात एकत्र खेळत आहेत. रोहित आणि विराट यांच्यातील मतभेदावर नेहमीच चर्चाही होते. पण मैदानात मात्र तसे काही चित्र दिसत नाही. वेस्ट इंडीज विरुद्धच्या सामन्यात रोहित आणि विराट यांच्यात ऑल इज वेलचा सीन पुन्हा अनुभवायला मिळाला.
कॅप्टन्सीच्या मुद्यावरुन भारतीय क्रिकेटमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता. विराट कोहलीने टी-20 वर्ल्ड कप संघाचे नेतृत्व सोडताना वनडे आणि कसोटीमध्ये कर्णधारपद करण्यास तयारी दर्शवली होती. पण बीसीसीआयने वनडेतून त्याच्याकडून नेतृत्व काढून घेतले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर त्याने कसोटी संघाचे नेतृत्वही सोडलं. आता तो केवळ खेळाडू म्हणून तिन्ही फॉर्मेटमध्ये मैदानात उतरेल. रोहितच्या नेतृत्वाखाली तो खेळणार का? दोघांचे विचार जुळणार का? असे प्रश्न क्रिकेट वर्तुळात चर्चेत होते. पण विराट कोहली आणि रोहित यांनी वेस्ट इंडीज विरुद्धच्या सामन्यात 'हम साथ साथ है'ची झलक दाखवून दिली. ही गोष्ट भारतीय क्रिकेटसाठी दिलासादायक अशीच आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.