IND vs WI 2nd T20 Playing 11 : पराभवानंतरही हार्दिक करू शकत नाही आपल्या प्लेईंग 11 मध्ये बदल

IND vs WI 2nd T20 Playing 11
IND vs WI 2nd T20 Playing 11 esakal

IND vs WI 2nd T20 Playing 11 : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा टी 20 सामना उद्या (दि. 6 ऑगस्ट) गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडियमवर होणार आहे. भारताने टी 20 मालिकेची खराब सुरूवात केली. पहिल्या सामन्यात भारताचा 4 धावांनी पराभव झाला.

भारतीय फलंदाजांनी या सामन्यात अत्यंत सुमार दर्जाची फलंदाजी केली. तिलक वर्मा सोडला तर इतर फलंदाजांकडून निराशाच झाली. अनेक अनुभवी फलंदाज सेट होऊन मोक्याच्या क्षणी बाद झाले. विंडीजच्या गोलंदाजीसमोर ते संघर्ष करताना दिसले.

IND vs WI 2nd T20 Playing 11
India Vs Pakistan : दबाव नाही तर... वर्ल्डकपमध्ये भारताकडून पाकिस्तान सारखं का हरतं? वकार युनूसने कोडं उलगडलं

पहिल्या टी 20 सामन्यात भारतासमोर 150 धावांचे आव्हान होते. भारताची तगडी फलंदाजी पाहता ते सहज पार होईल असे वाटत होते. मात्र भारताला 145 धावांपर्यंतच मजल मारता आली. आता दुसरा सामना हा गयाना येथे रविवारी खेळला जाणार आहे. पराभवानंतर भारतीय संघात दुसऱ्या टी 20 सामन्यात बदल केला जाईल असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र हार्दिक पांड्याला संघात बदल करण्यासाठी फारसा वाव नाही असं दिसतंय. (India Vs West Indies 2nd T20)

गयानाची खेळपट्टी ही फिरकीपटूंना चांगली साथ देणार असते. त्यामुळे भारतीय फलंदाजांचा कस लागणार आहे. दुसऱ्या टी 20 सामन्यात भारतीय प्लेईंग 11 मध्ये बदल होण्याची शक्यता कमी आहे. जर कोणता खेळाडू दुखापतग्रस्त असेल तरच संघात बदल होईल.

पहिल्या सामन्यात इशान किशनच्या बॅटमधून फारशा धावा आल्या नाहीत. मात्र दुसऱ्या सामन्यात देखील तोच डावाची सुरूवात करेल. त्यामुळे यशस्वी जयस्वालला टी 20 पदार्पण करण्यासाठी अजून वाट पहावी लागले. तिसऱ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव खेळेल. त्याच्याकडून चांगल्या कामगिरीचा अपेक्षा आहे.

IND vs WI 2nd T20 Playing 11
Babar Azam Salary : पाक क्रिकेटपटूंचा पगार चार पटीनं वाढला, मात्र भारतीय खेळाडूंच्या तुलनेत अजून गरिबी रेषेखालीच!

तिलक वर्माने पहिल्या सामन्यात चांगली फलंदाजी करत सर्वाधिक 39 धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याची संघातील जागा पक्की आहे. त्यानंतर हार्दिक पांड्या फलंदाजीला येईल. तर संजू सॅमसन हा मॅच फिनिशरच्या भुमिकेत असेल. पहिल्या सामन्यात त्याला फारशी चमक दाखवता आली नाही. मात्र संघात तो असेलच फक्त त्याच्या फलंदाजीचा क्रम वर खाली होऊ शकतो. कारण दुसरा मधल्या फळीतील फलंदाजच स्क्वाडमध्ये नाही.

गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर फिरकीपटू कुलदीप यादव, युझवेंद्र चहल यांनी पहिल्या सामन्याच चांगला मारा केला. तसेच गयानाची खेळपट्टी फिरकीला साथ देणारी असेल. त्यामुळे अक्षर पटेल देखील संघात असेल. वेगवान गोलंदाजीची धुरा ही अर्शदीप आणि मुकेश कुमारच्या खांद्यावर असेल.

भारताची दुसऱ्या टी 20 सामन्याची संभाव्य प्लेईंग 11 :

शुभमन गिल, इशान किशन (विकेटकिपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), संजू सॅमसन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com