VIDEO : पंतचा एकहाती षटकार; माहोलच!

Rishabh Pant one handed Sixer
Rishabh Pant one handed SixerSakal

India vs West Indies, 2nd T20I, Rishabh Pant Fifty : वेस्ट इंडीज विरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात रिषभ पंतची फटकेबाजी पाहायला मिळाली. त्याने 28 चेंडूत 52 धावांची नाबाद खेळी केली. आपल्या या खेळीत त्याने 7 चौकार आणि एक अफलातून षटकार खेचल्याचे पाहायला मिळाले. अखेरच्या टप्प्यात जेसन होल्डरच्या षटकात पंतने एका हाताने मारलेला षटकार डोळ्याचं पारणं फेडणारा असाच होता. प्रेक्षक गॅलरीतूनही या फटक्याला दाद मिळाल्याचे पाहायला मिळाले.

दुसऱ्या टी-20 सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघावर (Team India) पहिल्यांदा बॅटिंग करण्याची वेळ आली. इशान किशन आणि रोहित शर्मा स्वस्तात माघारी फिरल्यानंतर विराट कोहलीनं अर्धशतकी खेळीसह डाव सावरला. तो बाद झाल्यानंतर सामन्याची सर्व सूत्रे रिषभ पंत (Rishabh Pant)आणि व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) यांनी आपल्या हाती घेतली.

Rishabh Pant one handed Sixer
कोण आहे Sakibul Gani? ज्यानं Ranji Trophy मध्ये रचला इतिहास

दोघांनी पाचव्या विकेटसाठी 76 धावांची भागीदारी रचत भारतीय संघाची धावसंख्या 180 + पार नेली. व्यंकटेश अय्यर 18 चेंडूत 33 धावा करुन परतल्यानंतर पंतने अर्धशतक पूर्ण केले. त्याने नाबाद 52 धावांची खेळी करत संघाच्या धावफलकावर 186 धावा लावल्या. पंतने टी-20 कारकिर्दीतील ही तिसरी फिफ्टी आहे. आपल्या अर्धशतकी इनिंगमध्ये पंतने पोलार्डच्या एका षटकात मारलेले तीन चौकारही बघण्याजोगे होते. भारतीय डावातील 15 व्या षटकातील पहिल्या चेंडूवर आणि याच षटकातील पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर पंतने पोलार्डचा समाचार घेतला.

वनडे आणि कसोटी सामन्यात दमदार कामगिरी करणारा पंत टी-20 मध्ये भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरतोय का? असा प्रश्न त्याच्या टी-20 तील कामगिरीवरुन निर्माण झाला होता. पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय संघाने विजय नोंदवला असला तरी त्याच्या खेळीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थितीत करण्यात आले होते. पण पंतने मोक्याच्या क्षणी दमदार चौका मारत अर्धशतकी खेळीनं टीकाकारांची तोंडे बंद करणारी खेळी करुन दाखवली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com