
अहमदाबाद: श्रेयस अय्यर आणि पंतची अर्धशतकी खेळी आणि तळाच्या फलंदाजीत दीपक आणि वाशिंग्टनच्या सुंदर अर्धशतकी भागीदारीच्या जोरावर भारतीय संघाने निर्धारित 50 षटकात 265 धावा केल्या आहेत. वेस्ट इंडीजकडून जेसन होल्डरनं चार विकेट घेतल्या. भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यातील 3 वनडे सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना आज ( दि. 11) नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगला आहे. भारताने (India National Cricket Team) पहिले दोन सामने जिंकून आधीच मालिका खिशात टाकली आहे.
82-7 : कॅप्टन निकोलस पूरनही माघारी, वेस्ट इंडीजकडून सर्वाधिक 34 धावा करणाऱ्या निकोलस पूरनला कुलदीपने दाखवला तंबूचा रस्ता
77-6 : फेबिन एलनच्या रुपात वेस्ट इंडीजने गमावली आणखी एक विकेट, कुलदीप यादवने त्याला खातेही उघडू दिले नाही
76-5 : प्रसिद्ध कृष्णाच्या खात्यात आणखी एक विकेट, जेसन 6 धावा करुन तंबूत
68-4 : ड्वेन ब्रावो कोहलीच्या हातात झेल देऊन माघारी, प्रसिद्ध कृष्णाला मिळाले यश
25-3 : ब्रुक्सला दीपकनं खातेही उघडू दिले नाही
25-2 : दीपक चाहरच्या गोलंदाजीवर सुर्यानं टिपला ब्रँडन किंगचा कॅच, त्याने 13 चेंडूत केल्या 14 धावा
19-1 : शाई होपनं पुन्हा केलं निराश; सिराजच्या गोलंदाजीवर 5 धावांवर झाला पायचित
भारतीय संघ सर्व बाद 265 धावा, वेस्ट इंडीजसमोर 266 धावांचे लक्ष्य
2018 नंतर जेसन होल्डरचा विकेट्सचा चौकार, भारताविरुद्ध चार विकेट्स घेण्यापूर्वी त्याने झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात केली होती अशी कामगिरी
265-10 : सिराज एका चौकाराचा धनी, होल्डरनं उडवल्या दांड्या
261-9 : वॉशिंग्टनची उपयुक्त खेळीलाही होल्डरनंच लावला ब्रेक, त्याने 34 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकारहस कुटल्या 33 धावा
250-8 : होल्डरनं कुलदीपला धाडलं तंबूत, त्याने अवघ्या पाच धावांची भर घातली
240-7 : जेसन होल्डरनं लावला दीपक चाहरच्या फटकेबाजीला ब्रेक, दीपकन 38 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 38 धावा केल्या
187-6 : श्रेयस अय्यरच्या रुपात भारतीय संघाला मोठा धक्का, हेडन वॉल्शनं 80 धावांवर केलं बाद
भारताचा निम्मा संघ माघारी; सूर्यकुमार अवघ्या 6 धावा करून बाद
अर्धशतकानंतर पंत लगेचच माघारी; भारताला चौथा धक्का
ऋषभ पंत, श्रेयस अय्यरने भारताचा डाव सावरला; रचली अर्धशतकी भागीदारी
42-3 : भारताला तिसरा धक्का; शिखर धवन देखील 10 धावा करून स्वस्तात माघारी
16-2 : अलझारी जोसेफने भारताला दिले पाठोपाठ दोन धक्के; रोहित पाठोपाठ विराट देखील माघारी
भारतीय संघात तीन बदल, केएल राहुल, दीपक हुड्डा, युझवेंद्र चहल बाहेर. तर कुलदीप यादव, शिखर धवन आणि श्रेयस अय्यर यांना संधी
भारताने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.