
IND vs WI 3rd T20I : कॅरेबियन स्टार्संनी पुन्हा टेकले गुडघे
India vs West Indies 3rd T20I : निकोलस पूरनच्या अर्धशतकाशिवाय अन्य स्टार खेळाडूंच्या फ्लॉपशोमुळे वेस्ट इंडीजनं शेवटचा सामनाही गमावला. भारतीय संघाने दिलेल्या 185 धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजचा संघ निर्धारित 20 षटकात 9 बाद 167 धावांपर्यंतच मजल मारु शकला. भारतीय संघाने तिसरा सामना 17 धावांनी जिंकला आहे. पहिल्यांदा बॅटिंग करताना भारतीय संघाची सुरुवातही खराब झाली. आघाडीच्या फलंदाज स्वस्तात माघारी फिरल्यानंतर सुर्यकुमार यादव आणि व्यंकटेश अय्यरनं संघाचा डाव सावरला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी नाबाद 91 धावांची भागीदारी केली. भारतीय संगाने निर्धारित 20 षटकात 5 बाद 184 धावा केल्या होत्या.
विंडीज संघाला नववा धक्का
शार्दुल ठाकूरला दुसरे यश, डॉमिनिक ड्रँक्स 4 धावांवर बाद
रोमारिओ शेफर्डही तंबूत
हर्षल पटेलनं 21 चेंडूत 29 धावा करणाऱ्या शेफर्डला रोहितकरवी केलं झेलबाद
निकोलस पूरनची एकाकी झुंजही संपली
शार्दुल ठाकूरला पहिले यश; निकोलस पूरने 47 चेंडूत 61 धावा केल्या. तिसऱ्या टी-20 सामन्यात त्याने तिसरे अर्धशतक पूर्ण केले. आपल्या या खेळीत त्याने 8 चौकार आणि 1 षटकार मारला
टीम इंडियाला सहावे यश
रोस्टन चेस 12 धावांची भर घालून तंबूत परतला; हर्षल पटेलनं त्याच्या दांड्या उडवल्या
विंडीजचा अर्धा संघ तंबूत
जेसन होल्डरच्या 2 (6) रुपात व्यंकटेश अय्यरला मिळाले आणखी एक यश, श्रेयस अय्यरनं घेतला झेल.
व्यंकटेश अय्यरला यश, विंडीजला चौथा धक्का
फलंदाजीत धमाका दाखवल्यानंतर व्यंकटेश अय्यरनं आपल्या गोलंदाजीतील धमका दाखवली. त्याने वेस्ट इंडीजचा कर्णधार कायरेन पोलार्डला 5 धावांवर तंबूत धाडले
रावमन पॉवेलन सुरावात चांगली केली पण...
रावमन पॉवेलनं संघाचा डाव सावरणारी 25 धावांची खेळी केली. पण हर्षल पटेलनं त्याला तंबूचा रस्ता दाखवला
शाई होपही स्वस्तात माघारी
दीपक चाहरने आपल्या दुसऱ्या षटकात मिळवलं दुसरे यश, 4 चेंडूत 2 चौकाराच्या मदतीने 8 धावा करुन शाई होपही तंबूत
वेस्ट इंडीजला पहिला धक्का, कायले मयर्स माघारी
दीपक चहरने पहिल्याच षटकात कायले मेयर्सला इशान किशनकरवी झेलबाद केले. त्याने एका चौकाराच्या मदतीने 6 धावांची भर घातली.
सुर्याची फिफ्टी, व्यंकटेश अय्यरचीही धमाकेदार फटकेबाजी
सुर्यकुमार यादवनं केलेले अर्धशतक आणि त्याला व्यंकटेश अय्यरनं दिलेली सुरेख साथ याच्या जोरावर टीम इंडियाने निर्धारित 20 षटकात 5 बाद 184 धावा केल्या. सुर्यानं 31 चेंडूत 62 धावा कुटल्या तो शेवटच्या चेंडूवर बाद झाला. दुसरीकडे व्यंकटेश अय्यर 19 चेंडूत 35 धावांवर नाबाद राहिला.
MGकर्णधार रोहित शर्मा स्वस्तात आटोपला
डॉमिनिकनं कर्णधार रोहित शर्माला केलं बोल्ड, त्याने 15 चेंडूत केवळ 15 धावा केल्या
भारतीय संघाला धक्क्यावर धक्के, इशान किशनही तंबूत
रोस्टन चेसनं सलामीवीर इशान किशनच्या खेळीला लावला ब्रेक, त्याने 31 चेंडूत 5 चौकाराच्या मदतीने 34 धावांची खेळी केली
श्रेयस अय्यरही माघारी, टीम इंडियाला दुसरा धक्का
विराट कोहलीच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळालेल्या श्रेयस अय्यर 16 चेंडूत 25 धावा करुन बाद झाला. वाल्शनं त्याची विकेट घेतली
भारतीय संघाला पहिला धक्का
सलामीवीर ऋतूराज गायकवाड अवघ्या 4 धावांची भर घालून तंबूत परतला, जेसन होल्डरनं त्याला मेयर्सकरवी झेलबाद केले.
आवेश खानला पदार्पणाची संधी
आवेश खान टी-20 सामन्यातून आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात करत आहे. त्याच्याशिवाय तिसऱ्या आणि अखेरच्या टी-20 सामन्यात ऋतूराज गायकवाडलाही संघात स्थान मिळाले आहे.
असा आहे भारतीय संघ
रोहित शर्मा, इशान किशन, ऋतूराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, व्यंकटेश अय्यर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, हर्षल पटेल, रवि बिश्नोई, आवेश खान.
कॅरेबियन संघान टॉस जिंकला
वेस्ट इंडीज संघाचा कर्णधार कायरेन पोलार्डनं नाणेफेक जिंकून पुन्हा एकदा पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधीही त्याने दुसऱ्या टी-20 सामन्यात टॉस जिंकला होता. पण त्याच्या संघाला ती मॅचही जिंकता आली नव्हती.
Web Title: India Vs West Indies 3rd T20i Live Cricket Score Record Avesh Khan T20i Debut West Indies Win Toss
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..