India vs West indies 5th t20i : श्रेयश आयरच्या जोरावर भारताने मारली 188 धावांपर्यंतच मजल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shreyas Iyer

Ind vs WI : श्रेयश आयरच्या जोरावर भारताने मारली 188 धावांपर्यंतच मजल

india vs west indies 5th t20i : IND vs WI 5th T20I : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील अंतिम सामना आज फ्लोरिडा यूएसए येथे खेळला जात आहे. आजच्या सामन्यासाठी भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली असून त्याच्या जागी हार्दिक पांड्या संघाचे नेतृत्व करत आहे. पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 7 गड्यांच्या मोबदल्यात 188 धावा केल्या.

हेही वाचा: IND vs AUS live : रेणुका ठाकूरने भारताला मिळून दिले पहिले यश; ऑस्ट्रेलिया पहिला धक्का

संघाकडून श्रेयस अय्यरने 64 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. त्याच्याशिवाय दीपक हुडा 38, संजू सॅमसन 15, दिनेश कार्तिक 12, इशान किशन 11, कर्णधार हार्दिक पंड्याने 28 धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून ओडिन स्मिथने तीन तर जेसन होल्डर, डॉमिनिक ड्रेक्स आणि हेडन वॉल्श यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

  • भारतीय संघ - ईशान किश, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, दिनेश कार्तिक (विकेटकिपर), हार्दीक पांड्या (कर्णधार), दीपक हुडा, अक्षर पटेल, आवेश खान, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, आणि अर्शदीप सिंह

  • वेस्ट इंडीज संघ - काइल मेयर्स, ब्रँडन किंग, निकोलस पूरन (कर्णधार), जेसन होल्डर, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, डॉमनिक ड्रेक्स, ओबेद मकॉय, डेवॉन थॉमस, अल्झारी जोसेफ, अकेल हुसेन.


Web Title: India Vs West Indies 5th T20i Shreyas Iyer Hardik Pandya Dinesh Karthik Lauderhill Florida Cricket

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..