India Women Beat Sri Lanka in 3rd T20
esakal
रेणुका सिंगच्या चार विकेट आणि शेफाली वर्माच्या आक्रमक नाबाद ७९ धावांच्या जोरावर भारताने तिसऱ्या टी-२० सामन्यात श्रीलंकेचा आठ विकेटने पराभव केला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली. एकदिवसीय विश्वविजेते असलेल्या भारताने मालिकेतील चारही सामन्यांत निर्विवाद वर्चस्व राखले. श्रीलंकेला २० षटकांत सात बाद ११२ धावांवर रोखल्यावर हे आव्हान १३.२ षटकांत केवळ दोन फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले.