IND vs PAK : क्रिकेट सोडा! इकडं भारतीय महिला फुटबॉल संघानं पाकला धूळ चारली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

India Women's Football Team Defeat Pakistan

IND vs PAK : क्रिकेट सोडा! इकडं भारतीय महिला फुटबॉल संघानं पाकला धूळ चारली

SAFF Women's Championship : आशिया कप क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान ड्रीम फायनल होणार या आशेवर बसलेल्या क्रिकेट चाहत्यांची निराशा झाली. भारत सुपर 4 मध्ये पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्याकडून पराभूत झाला आणि स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले. मात्र निराश झालेल्या क्रीडा रसिकांसाठी भारतीय महिला फुटबॉल संघाने आनंदाची बातमी दिली. SAFF Women's Championship मध्ये गतविजेत्या भारताने पाकिस्तानचा 3 - 0 असा पराभव केला. (India Women's Football Team Defeat Pakistan)

हेही वाचा: PAK vs AFG : बाबरचं नशिब चांगलं! पुन्हा नाणेफेक जिंकली

नेपाळमधील काठमांडू येथील दशरथ स्टेडियमवर झालेल्या सामन्यात आज भारताने पाकिस्तानचा 3 - 0 अशा गोलफरकाने पराभव करत स्पर्धेची विजयी सुरूवात केली. भारताने या अजिंक्यपद स्पर्धेतील आपली विजयाची घोडदौरड 27 सामने कामय राखली आहे.

हेही वाचा: US Open Video : किती हा राग! पराभवानंतर निक कर्गिओसची कोर्टवरच आदळ-आपट

भारत पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानची कर्णधार मारिया जमील खानने स्वयम गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर दांगमेई ग्रेसने पहिल्या हाफमध्ये अजून एक गोल करत पाकिस्तानविरूद्ध 2 - 0 अशी आघाडी घेतली. मात्र दुसऱ्या हाफमध्ये पाकिस्तानने स्वतःवर गोल होऊ दिला नव्हता. परंतु एक्स्ट्रा टाईममध्ये भारताच्या सौम्या गगुलोथने पाकिस्तानवर अजून एक गोल करत भारताचा विजय 3 - 0 असा साकारला. आता भारताचा पुढचा सामना 10 सप्टेंबरला मालदीवसोबत होणार आहे.

Web Title: India Womens Football Team Defeat Pakistan In Saff Womens Championship

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..