India Women’s World Cup 2025 Victory

India Women’s World Cup 2025 Victory

esakal

ICC Announced Prize for India : वर्ल्ड कप विजयाची ट्रॉफी अन् कोट्यवधीचं बक्षीस! भारतीय महिला क्रिकेटपटूंसाठी आयसीसीची मोठी घोषणा...

India Women’s World Cup 2025 Victory Prize : दक्षिण आफ्रिकेनंतरच्या विजयानंतर आता भारतीय संघावर बक्षीसांची उधळण केली जाते आहेत. आयसीसीने विजेत्या संघासाठी मोठ बक्षीस जाहीर केलं आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेलाही कोट्यवधीचं बक्षीस दिलं जाणार आहे.
Published on

Team India wins the ICC Women’s Cricket World Cup 2025, defeating South Africa by 52 runs. :आयसीसी महिला क्रिकेट विश्वकप स्पर्धेत भारताने दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव केला आहे. या विजयासह भारतीय संघाने पहिल्यांदाच विश्वकप ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. याशिवाय महिला वनडे वर्ल्ड कप जिंकणारा भारत चौथा संघ ठरला आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड यांनी विजेतेपद जिंकले आहे.

भारताच्या या विजयात अष्टपैलू दीप्ती शर्मा आणि शफाली वर्मानं महत्त्वाचं योगदान दिलं. या दोघींनीही अंतिम सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजीतही महत्त्वाची भूमिका बजावत भारताच विजय निश्चित केला. भारताकडून शफाली वर्माने सर्वाधिक ८७ धावांची खेळी केली. तर दीप्ती शर्माने ५८ चेंडूत ५८ धावांची, स्मृती मानधनाने ४५ धावांची, तसेच ऋचा घोषनेही २४ चेंडूत ३४ धावांची आक्रमक खेळी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com