ऑलिम्पिकमध्ये भारताला आतापर्यंत 10 वेळा गोल्ड; जाणून घ्या इतिहास

olympic
olympic
Updated on

नवी दिल्ली- ऑलिम्पिक स्पर्धा प्रतिष्ठेच्या मानल्या जातात. गेल्या काही वर्षात भारतीय खेळाडू ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. असे असले तरी भारताच्या नावावर खूप कमी गोल्ड मेडल आहेत. भारताने 10 वेळा गोल्ड मिळवण्याची कामगिरी केली आहे. यातील आठ गोल्ड भारताला हॉकीमध्ये मिळाले आहेत. वैयक्तिक गटात तर भारताला आतापर्यंत फक्त एक गोल्ड मिळाला होता. 2008 मध्ये भारतीय नेमबाज अभिनव बिंद्राने पहिल्यांदा भारताला वैयक्तिक गोल्ड मिळवून दिला होता. त्यानंतर आता 2021 मध्ये भालाफेकमध्ये नीरज चोप्राने भारताला गोल्ड मिळवून देण्याची कामगिरी केली आहे. नीरज चोप्राने भारताची मान जगात उंचावली आहे. आतापर्यंत भारताला केव्हा-केव्हा गोल्ड पदक मिळालयं हे आपण पाहूया...

भारताला आतापर्यंत एकूण 34 ऑलिम्पिक पदकं मिळाली आहेत. त्यातील 10 गोल्ड आहेत...

1928- हॉकी

1932-हॉकी

1936-हॉकी

1948-हॉकी

1952-हॉकी

1956-हॉकी

1964-हॉकी

1980-हॉकी

2008- नेमबाजी (अभिनव बिंद्रा)

2021-भालाफेक (नीरज चोप्रा)

Tokyo Olympics 2020 टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील पुरुष भालाफेक गटात इंडियन आर्मी मॅन नीरज चोप्रानं इतिहास रचलाय. पात्रता फेरीतील कामगिरीत आणखी सुधारणा करत त्याने यंदाच्या स्पर्धेत तमाम भारतीयांना सोनेरी क्षणाची अनुभूती देणारी कामगिरी केली. सर्वात लांब भाला फेकत त्याने टोकियो ऑलिम्पिकमधील पहिले आणि आतापर्यंतच्या इतिहासातील दुसरे गोल्ड मिळवून दिलय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com