
Indian Womens Kabaddi Team Won Against Bangladesh: आशियाई महिला कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेच्या सहाव्या आवृत्तीचे आयोजन इराणमधील तेहराण या शहरात करण्यात आले आहे. स्पर्धेत गुरूवारी भारतीय महिला कबड्डी संघाने बांगलादेशवर एकतर्फी विजय मिळवला. बांगलादेशला भारतीय महिला संघाकडून ६४-२७ गुणांनी पराभव पत्करावा लागला.
सकाळच्या सत्रात यजमान इराणने ब गटातील त्यांच्या पहिल्या सामन्यात इराकवर ५८-१३ गुणांनी मात केली. तर मलेशियालाने थायलंडविरूद्धचा सामना ४५-२४ गुणांनी गमावला. भारताविरूद्ध पराभूत झालेला बांगलादेश संघ आपला दुसरा सामना मलेशियाविरुद्ध खेळणार आहे.