IPL 2025: इंडियन प्रीमिअर लीग २०२५ तोंडावर आली असताना सनरायझर्स हैदराबाद संघाला मोठा धक्का बसला आहे. SRH संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज ब्रायडन कार्स ( BRYDON CARSE) दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. हैदराबाद फ्रँचायझीनं त्याच्या जागी दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू वियान मुल्डर ( Wiaan Mulder) याला संघात समाविष्ट केलं आहे. सनरायझर्स हैदराबादने आयपीएल लिलावात ब्रायडन कार्ससाठी एक कोटी रुपये मोजले होते.