INDvsSA : रोहितची तोफ धडाडणार; भारताची बॅटिंग

वृत्तसंस्था
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाहिल्या कसोटी सामन्याला आज सुरवात झाली. भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

विशाखापट्टणम : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाहिल्या कसोटी सामन्याला आज सुरवात झाली. भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

INDvsSA : भारताला पहिल्या डावात रोखले तरच थोड्या आशा नाहीतर...

भारतीय संघात तीन बदल करण्यात आले. सलामीवीर म्हणून रोहित शर्माला संधी देण्यात आली तर फिरकीपटू आर अश्विनला संघात स्थान देण्यात आले. सातत्याने अपयशी ठरणाऱ्या रिषभ पंतला वगळून वृद्धीमान साहाला स्थान देण्यात आले.

रोहितसाठी ही खूप मोठी संधी आहे. आम्ही त्याच्यासाठी खूप आनंदी आहे. माझ्यामते साहा जगातील सर्वोत्तम यष्टीरक्षांपैकी एक आहे. 
- विराट कोहली, भारताचा कर्णधार

 

पहिली लढत : 2 ते 6 ऑक्टोबर - विशाखापट्टणम
दुसरी लढत : 10 ते 14 ऑक्टोबर - पुणे 
तिसरी लढत : 19 ते 23 ऑक्टोबर - रांची


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India won the toss and elected to bat first against South Africa